spot_img
देशमोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी; कारणही सांगितलं

मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी; कारणही सांगितलं

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री वांद्रे येथील त्यांच्याच ऑफिससमोर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणात पोलिसांनी तीनपैकी दोन आरोपींना अटक केली तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. त्यासंबंधीत एक भलीमोठा पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली याचं कारण सांगणारी एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. तसेच, या हत्येसाठी अभिनेता सलमान खान हा जबाबदार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये बिश्नोई गँगने म्हटलं की, “ओम जय श्री राम, जय भारत, मला जीवनाचं सार समजतं आणि संपत्ती आणि शरीराला मी धूळ समजतो. मैत्रीच्या कर्तव्याचा सन्मान करत मी जे योग्य होतं तेच केले.

सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं. पण तुझ्यामुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला. आज बाबा सिद्दीकी यांचा शालीनपणाचा सागर संपला आहे किंवा एकेकाळी त्याच्यावर दाऊदसोबत मकोका होता. त्याच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्याचे दाऊद आणि अनुज थापन यांच्यासोबत बॉलिवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहाराशी असलेले संबंध.

आमचं कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मात्र, सलमान खान किंवा दाऊद टोळीला मदत करणारा जो कोणी असेल त्याने तयार राहावे. जर कोणी आमच्या भावांना मारले तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. आम्ही कधीच पहिला वार करत नाही. जय श्री राम, जय भारत, शहीदांना विनम्र अभिवादन.
सच्चा मित्र गमावला! बाबा सिद्दिकींच्या इफ्तार पार्टीची आठवण सांगत चव्हाण यांची भावुक प्रतिक्रिया

बाबा सिद्दीकी हे दसऱ्याला शनिवारी (१२ ऑक्टोबर) रात्री त्यांच्या वांद्र्याच्या निर्मलनगर येथील ऑफिसमधून घरी जायला निघाले. ऑफिसबाहेर फटाके उडवत असतानाच तीनजळ गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी गोळीबार करण्यात सुरुवात केली. त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा राऊंड फायर केले. यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या छातीला दोन गोळ्या लागल्या आणि ते तिथेच खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...