Today News:गेल्या काही दिवसांपासून नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची बदली होणार असल्याच्या चर्चा शहरात जोरदार सुरु होत्या. अखेर यावर आज सायंकाळी शिक्कामोर्तब झाले आहे असून नाशिक महापालिकेला नवीन आयुक्त मिळाले आहेत.
नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. अशोक करंजकर यांच्या जागी आयएएस अधिकार राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्डिले हे वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी राज्य सरकारने नेमणूक केली आहे. कर्डिले हे म्हसुरी येथे प्रशिक्षण घेत असून ते २७ किंवा २८ डिसेंबर रोजी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वीच नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर हे (दि.३१ डिसेंबर २०२४) पर्यंत वैद्यकीय रजेवर असल्यामुळे शासनाने आयुक्तपदाचा प्रभारी पदभार एनएमआरडीच्या आयुक्त असलेल्या मनीषा खत्री यांच्याकडे सोपविण्यात आल्याची ऑर्डर काढली होती. त्यानंतर आता राहुल कर्डिले यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.