spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी : चिलीच्या जंगलात अग्निकल्लोळ ! 46 मृत्युमुखी, हजारो घरे जळाली

मोठी बातमी : चिलीच्या जंगलात अग्निकल्लोळ ! 46 मृत्युमुखी, हजारो घरे जळाली

spot_img

नवी दिल्ली / नगर सहयाद्री : सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. चिलीच्या जंगलामध्ये भीषण अग्निकल्लोळ उडाला आहे. ही आग इतकी भीषण आहे की यात 46 जणांचा मृत्यू झाला असून हजारो घरे जळाली आहेत.

मध्य आणि दक्षिण चिलीमध्ये ही आग लागली आहे. जंगलातील आगीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीम खबरदारीचा उपाय म्हणून जळालेल्या घरांमध्ये शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जंगलातील आग पसरत असल्याने धोका आणखी वाढला आहे.

भीषण आग पाहता चिली सरकारने देशात आणीबाणी जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. चिलीच्या गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी सांगितलं की, सध्या देशाच्या मध्यभागी आणि दक्षिणेकडील 92 जंगलांना आग लागली आहे, जेथे या आठवड्यात तापमान खूप वाढले आहे. दाट लोकवस्तीच्या परिसरात जंगलातील भीषण आग पसरल्याने जवळपास 1100 घरं जळून खाक झाली. सर्वात भीषण आग वालपराइसो परिसरात लागली.

अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांची हालचाल सुलभ करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. वालपराइसो परिसरात तीन निवारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. चिलीच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 19 हेलिकॉप्टर आणि 450 हून अधिक अग्निशमन दलाचे कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...