Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Election:दर वीस दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरमेध्ये नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणूका होणार आहे. त्यानंतर वीस दिवसांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका तर शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
जानेवारीच्या शेवटापर्यंत सर्व निवडणूका पुर्ण करण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरु आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष पदाची सोडत काढण्यात आली आहे. काही दिवसांत महापालिका आरआरक्षणाची सोडत निघणार असुन प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावरील प्रशासन राज संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींच राज्य येणार आहे.
राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगर विकास विभागांचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, छापवाले, उपसचिव विद्या हम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील 247 नगरपरिषदेपैकी 33 पदे अनुसूचित जातींसाठी व 11 पदे अनुसूचित जमातीसाठी आणि 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर 136 पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.