spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! आसाराम बापू यांना जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी! आसाराम बापू यांना जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ८५ वर्षीय आसाराम बापूला ३१ मार्च पर्यंत अंतरीम जामीन मंजूर झाला आहे, पण या काळात त्यांना आल्या अनुयायांना भेटता येणार नाही, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. सध्या त्यांच्यावर जोधपूरच्या आरोग्य मेडीकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

आसाराम बापूला हृदयाशी संबंधित आजार आहे. याआधी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. अंतरिम जामीन देत असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जेणेकरून त्यांच्यावर देखरेख ठेवता येईल. गांधीनगर सत्र न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये आसाराम बापू या नावाने प्रसिद्ध असलेल्या आसुमल हरपलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एका बलात्कार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एकेकाळी देशातील एक शक्तिशाली व्यक्ती असलेल्या आसाराम बापूचा अस्त झाला. बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापूची ही दुसरी शिक्षा होती.

यापूर्वी, एप्रिल २०१८ मध्ये राजस्थानमधील जोधपूरच्या आश्रमात एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. २०१३ मध्ये आसाराम बापूवर जोधपूर आणि गांधीनगर येथे बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.बलात्काराचे गुन्हे दाखल होण्यापूर्वी आसाराम बापू लोकप्रिय धर्मगुरू होते. १९७० च्या दशकात अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर त्याने पहिला आश्रम सुरू केला होता. त्यानंतर आसाराम बापूने संपूर्ण देशभरात कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले. त्याच्या आश्रमातील विविध उत्पादनांना आणि आध्यात्मिक साहित्यांना देशभरात प्रचंड मागणी होती. त्याच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जाते. राजकीय वर्तुळातही आसाराम बापूचे अनेक अनुयायी होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त...

नात्याला कलंक! बाप की सैतान? पोटच्या मुलीवर अत्याचार, शहर हादरले

Crime News: गेल्या महिन्याभरात अल्पवयीन मुलीवर आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत...

“साकळाई, कुकडीसह अन्य प्रकल्पाचा मंत्री विखे पाटील यांनी घेतला आढावा”

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जलसंपदा विभागाने बांधकामाधीन सिंचन प्रकल्पाची कामे गतीने करून प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र...

कोल्हापूर हादरलं! मामाने भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केला भलताच कुटाणा; भयानक कारण समोर…

कोल्हापूर / नगर सह्याद्री - प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हटलं जातं....