spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा...

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. नुकतंच अजित पवार यांनी पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. पुणे मनपात भाजप राष्ट्रवादीला सोबत घेण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्यामुळे अजित पवारांनीही आपल्या शिलेदारांना स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

अजित पवारांनी पुण्यात माजी नगरसेवकांच्या बैठकीत मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीच्या सर्व माजी नगरसेवकांच्या बैठकीत अजित पवारांनी स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. प्रभाग रचना आली असून, तशी लढण्याची तयारी ठेवा असं अजित पवार म्हणाले आहेत.
सुचना हरकतीत जे काही बदल होतील ते होतील, पण स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

पुणे मनपात भाजपा राष्ट्रवादीला सोबत घेण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्यामुळे अजित पवारांनीही आपल्या शिलेदारांना स्वबळावर लढण्याचे दिले स्पष्ट संकेत दिले आहेत. प्रभाग रचनाही भाजपच्याच सोईची असल्याने राष्ट्रवादी नगरसेवकांच्या तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज पक्ष नगरसेवकांची बैठक बोलावली होती.

राज ठाकरेंकडूनही तयारीला लागण्याचे आदेश
राज ठाकरेंनी ठाण्यात मनसैनिकांसोबत झालेल्या बैठकीत आदेश दिले आहेत. निवडणुकीला लागा, युती आघाडी की बाकी काय ते नंतर सांगतो. मनसेची आपली ताकद आहे ती आणता बळकट करा असा कानमंत्र राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला आहे. निवडणूक याद्यांवर काम करा, बूथ टू बूथ माणसे निवडा. त्यावर काम करा, मतदार याद्या वारंवार चाळा. एक महिन्यात मी तुम्हाला पुन्हा विचारणार काय काम केले आणि लवकरच पुन्हा एकदा पदाधिकारी मेळावा लावणार असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...

श्रीरामपूरच्या रस्त्यावर थरार; भरदुपारी गोळीबार; आमदार ओगले म्हणाले, पोलीस सामील..

श्रीरामपूर । नगर सहयाद्री:- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गिरमे चौकात भरदुपारी घडलेल्या गोळीबारामुळे शहरात...