पुणे । नगर सहयाद्री:-
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीतून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे २५ उमेदवार ठरले आहेत.
विशेष म्हणजे अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार आहेत. २५ उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत. अहमदनगर शहरातून आमदार संग्राम जगताप यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत विधानसभा निवडणुकांसाठी २५ उमेदवार ठरले आहेत. लवकरच जागावाटप पूर्ण होणार आहे. महायुतीची चर्चा सुरु आहे मात्र तयारी असावी या दृष्टीने आतापासून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
अजित पवार बारामतीमधूनच लढणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. अजित पवारांव्यतिरिक्त उमेदवार बारामतीत नसणार. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर वडगाव शेरीतून सुनील टिंगरेच पुन्हा रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार?
बारामती : अजित पवार, उदगीर : संजय बनसोडे, आंबेगाव : दिलीप वळसे-पाटील, दिंडोरी : नरहरा झिरवळ, येवला : छगन भुजबळ, पुसद : इंद्रनील नाईक, वाई खंडाळा महाबळेश्वर : मकरंद आबा पाटील, पिंपरी : अण्णा बनसोडे, परळी : धनंजय मुंडे, इंदापूर : दत्ता भरणे, रायगड : अदिती तटकरे, कळवण : नितिन पवार, मावळ : सुनील शेळके, अमळनेर : अनिल पाटील, अहेरी : धर्मराव बाबा अत्राम, कागल : हसन मुश्रीफ, खेड : दिलीप मोहिते-पाटील,
अहमदनगर : संग्राम जगताप जुन्नर : अतुल बेनके, वडगाव शेरी : सुनील टिंगरे.