spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी : 113 महाविद्यालयांचे प्रवेश थांबवले, कारण आले समोर...

मोठी बातमी : 113 महाविद्यालयांचे प्रवेश थांबवले, कारण आले समोर…

spot_img

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (BAMU) भौतिक सुविधांच्या अभावामुळे आणि बोगस प्रक्रियांमुळे चार जिल्ह्यांतील 113 नामांकित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

यामध्ये उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रावसाहेब दानवे, सुप्रिया सुळे, सतीश चव्हाण, प्रकाश साळुंके, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, बसवराज पाटील आणि मधुकर चव्हाण यांच्या संबंधित शिक्षण संस्थांचा समावेश आहे.

विद्यापीठाच्या तीन सदस्यीय समितीने केलेल्या तपासणीत प्राध्यापकांच्या बोगस नियुक्त्या, वेतन न देणे आणि बायोमेट्रिक हजेरीसह अन्य सुविधांचा अभाव आढळून आला. हा निर्णय 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी लागू आहे.

विद्यापीठाच्या विद्यापरिषद आणि व्यवस्थापन परिषदेने राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद (NAAC) मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

NAAC मूल्यांकनासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी आवश्यक सुविधा आणि प्राध्यापक नियुक्त्यांचे निकष पूर्ण केले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने कठोर पाऊल उचलत 113 महाविद्यालयांचे प्रवेश बंद केले.

जिल्हानिहाय प्रवेश थांबवलेली महाविद्यालये
छत्रपती संभाजीनगर: 79
जालना: 40
बीड: 44
धाराशिव: 24

प्रवेश थांबवलेल्या प्रमुख शिक्षण संस्था
हरिभाऊ बागडे: संत सावतामाळी महाविद्यालय, फुलंब्री
चंद्रकांत पाटील: आर.पी. महाविद्यालय, धाराशिव
पंकजा मुंडे, धनंजय मुंडे: वैजनाथ महाविद्यालय, परळी
रावसाहेब दानवे: मोरेश्वर महाविद्यालय, भोकरदन
सुप्रिया सुळे: मौलाना आजाद शिक्षण संस्था, कासेल
सतीश चव्हाण, प्रकाश साळुंके: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची 5 महाविद्यालये
राजेश टोपे: मत्स्योदरी शिक्षण संस्था, जालना
जयदत्त क्षीरसागर: आदर्श शिक्षण संस्था, बीड
बसवराज पाटील: माधवराव पाटील महाविद्यालय, मुरुम
राणा जगजीतसिंह: तेरणा महाविद्यालय, धाराशिव
मधुकर चव्हाण: नळदुर्ग महाविद्यालय, धाराशिव

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...