मुंबई / नगर सह्याद्री : सिनेसृष्टीतून दुःखद बातमी आली आहे. दूरदर्शनरील मालिका गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभेनेत्रीचे निधन झाले आहे. दूरदर्शनवरील ‘उडान’ मालिकेमुळे प्रासिद्ध झालेल्या अभिनेत्री, निर्माती कविता चौधरी यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल.
पोलिस अधिकारी कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या धाकट्या बहीण होत्या. दूरदर्शनवरील ‘उडान’ मालिकेत त्यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंहची भूमिका साकारली होती. त्यांनी आयपीएस डायरीज आणि युअर ऑनर हे दोन टेलिव्हिजन शोही बनवले होते. माध्यम रिपोर्टनुसार, आज १६ फेब्रुवारी रोजी अमृतसर येथील शिवपुरीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कविता या उत्तम अभिनेत्री आणि निर्मात्याही होत्या. शिवाय एका जाहिरातीतूनही त्यांचा चेहरा घराघरात पोहोचला होता. १९८० साली आलेल्या सर्फच्या जाहिरातीतून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. कविता यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.