Train Accident:भरधाव ट्रक थेट ट्रॅकवर आल्यामुळे जळगावमध्ये मुंबई-अमरावती एक्सप्रेस ट्रेनचा अपघात झाला. पहाटे चार वाजता अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. धान्याने भरलेला ट्रक थेट रेल्वे क्रॉसिंग गेट तोडून ट्रकवर आल्यामुळे भीषण अपघात घडला. अपघातानंतर रेल्वे वाहतूकीवर मोठा परिणाम झाला असून या मार्गावरील अनेक एक्सप्रेस, ट्रेन उशीरा धावत आहेत.
शुक्रवारी पहाटे ४ वाजता बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसचा अपघात झाला. धान्याने भरलेला ट्रक थेट ट्रॅकवर आला, त्यामुळे एक्सप्रेस आणि ट्रकचा अपघात झाला. अपघातानंतर जळगावमध्ये एकच खळबळ उडाली. मुंबई हावडा मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेकडून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मुंबई-अमरावती एक्स्प्रेसच्या अपघाताची माहिती मिळताच जळगावमध्ये एकच खळबळ उडाली. रेल्वेकडून तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. शुक्रवारी पहाटे चार वाजता बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक ट्रॅकवर आला, त्याचवेळी अमरावती एक्सप्रेस येत होती. धान्याचा ट्रक आणि एकस्प्रेसची धडक झाली. सुदैवाने एक्सप्रेसचा वेग कमी होता, त्यामुळे मोठी दुर्गघटना टळली. या अपघातात कोणताही जिवितहानी झाली आहे. जखमी झालेल्यांवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी पहाटे चार वाजता बोदवड येथे बंद असलेले रेल्वे गेट एका धान्याने भरलेल्या ट्रकने उडवले. भरधाव वेगातील ट्रक हा ट्रॅकवर जाऊन थांबला. त्याच वेळेस तिकडून येणारी मुंबई अमरावती एक्सप्रेस या ट्रकवर येऊन धडकल्याने सुमारे 100 मीटर ट्रक हा ट्रॅकवर पुढे जाऊन पडला. सुदैवाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठे जिवितहानी टळली आहे.