मुंबई। नगर सहयाद्री-
राज्यासह देशात सर्वच राजकीय पक्षांनी सध्या लोकसभा निवडणुकीची तयार सुरू केली आहे. यादरम्यान जागावाटपाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या पक्षातील मतभेद समोर येत आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी रात्री भाजप नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. संजय निरूपम हे काल रात्री भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार दिला जाणार असल्याने संजय निरुपम नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. संजय निरूपण यांनी देखील पत्रकार परिषद घेत याबद्दल उघड नाराजी बोलून दाखवली आहे. यानंतर आथा निरुपम हे थेट अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये येणार : महाजन
काही दिवसांपुर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांनी मोठा दावा केला आहे. राहुल गांधींची यात्रा मुंबईत पोहोण्याच्या आधीच काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा महाजनांनी केला आहे. त्यांचे हे वक्तव्य व एकीकडे निरुपम व चव्हाण यांची भेट यामुळे आता संजय निरुपम हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.