मुंबई । नगर सहयाद्री
दिवाळीच्या स्वागताला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशीचा शुभदिन. या विशेष दिवसाचं औचित्य साधून आज बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढत असलेल्या दरांनंतर, आज सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने मोठी दिलासादायक बातमी आहे.
आज १८ ऑक्टोबर २०२५. आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,९१० रूपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,३०,८६० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १९,१०० रूपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १३,०८,६०० रूपये मोजावे लागतील. सोन्याच्या भावात घट झाल्यामुळे सामान्यांना आज सोनं खरेदी करताना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
१८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,४४० रूपयांची घट झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९८,१४० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १४,४०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,८१,४०० रूपये मोजावे लागतील.
फक्त सोनं नाही तर, चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीच्या दरात १ ग्रॅममागे १३ रूपयांची घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १७२ रूपये मोजावे लागतील. तर, १ किलो चांदीच्या दरात १३,००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,७२,००० रूपये मोजावे लागतील.