spot_img
अहमदनगरदहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने युवकाची मोठी फसवणूक, नगरमध्ये असा घडला प्रकार

दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने युवकाची मोठी फसवणूक, नगरमध्ये असा घडला प्रकार

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 10 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने एका युवकाची चार लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमराज धोंडीभाऊ कुनगर (वय 22 रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा, हल्ली रा. यशवंत कॉलनी, नगर- सोलापूर रस्ता, अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

दरम्यान, कुनगर यांनी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात तक्रार दखल केली होती. त्या तक्रारीवरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. लोणे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर कुनगर यांच्या फिर्यादीवरून सोमवारी (18 नोव्हेंबर) नगर तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण दिपेश देशमुख (रा. लक्ष्मी संकुल, भुषण कॉलनी, एमजी कॉलेजच्या पाठीमागे, ता. जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरची घटना 11 सप्टेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 दरम्यान घडली आहे. फिर्यादी हे शिक्षण घेतात. ते सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान नगर तालुक्यातील साकत खुर्द व अहिल्यानगर शहरातील अहमदनगर कॉलेजमध्ये असताना त्यांनी संशयित आरोपीकडे शेअर मार्केटसाठी गुंतवणूक केली होती. त्याने गुंतवणूकीवर 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. फिर्यादी यांनी संशयित आरोपीला युपीआय मार्फत चार लाख रूपये पाठविले होते. दरम्यान, संशयित आरोपीने फिर्यादीला मोबदला न देता त्यांची फसवणूक केली.
याविरूध्द फिर्यादीने न्यायालयात तक्रार दाखल केली. तेथे त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार लबडे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....