spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसमध्ये मोठा भूकंप, दोन बडे नेते करणार भाजपात प्रवेश

काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, दोन बडे नेते करणार भाजपात प्रवेश

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाला देखील वेग आला आहे. आता या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दोन नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यातील एक प्रवेश उद्या म्हणजे मंगळवारी होणार आहे, तर दुसरा पक्षप्रवेश हा एक ऑगस्टनंतर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला जालन्यात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि पाथरीचे माजी आमदार सुरेश वरपूडकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुरेश वरपूडकर हे उद्या मंगळवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. तर कैलास गोरंट्याल यांचा एक तारखेनंतर भाजपात पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे, कैलास गोरंट्याल यांच्यासोबत काही नगरसेवकही भाजपात प्रवेश करणार आहेत. गोरंट्याल यांच्या पक्ष प्रवेशावेळी भाजप नेते अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत, दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये गोंरट्याल भाजपात प्रवेश करणार आहेत.

माजी आमदार सुरेश वरपूडकर हे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत, तर कैलास गोरंट्याल यांचा भाजपात होणारा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे, ते 1 तारखे नंतर भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः गोरंट्याल यांनी दिली आहे. उद्या सुरेश वरपूडकर यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचंही यावेळी गोरंट्याल यांनी सांगितल आहे. दरम्यान माझ्या पक्षप्रवेश सोहळ्याला अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अतुल सावे उपस्थित राहणार असल्याची माहितीही यावेळी गोरंट्याल यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत, महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आता आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश

वर्धा / नगर सह्याद्री - राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. सुरुवातीला जिल्हा...

शनीची साडेसाती, आत्महत्येच्या वाटेने!

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त, डेप्युटी सीईओ नितीन शेटे यांनी राहत्या घरात घेतला गळफास शनिशिंगणापूर |...

नगरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- वडगाव गुप्ता येथील धुमाळ वस्तीमध्ये राहणाऱ्या सोपान जगन्नाथ गिते (वय 62)...

महाराष्ट्राची लेक वर्ल्ड चॅम्पियन; १९ वर्षीय दिव्या देशमुखने घडवला इतिहास

नागपूर / वृत्तसंस्था - ६४ चौकोनांवर गेल्या १४ वर्षांत खेळत दिव्या देशमुखने आपले नाव इतिहासात...