spot_img
ब्रेकिंगसाई संस्थानचा मोठा निर्णय; जेवणासाठी लागणार..

साई संस्थानचा मोठा निर्णय; जेवणासाठी लागणार..

spot_img

शिर्डी| नगर सह्याद्री:-
शिर्डी संस्थानाच्या दोन कर्मचाऱ्यांचा चाकू हल्ल्‌‍यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी संस्थानाने कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल केला होता. त्यानंतर आता शिर्डी संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या अन्नछत्राच्या मोफत जेवणाविषयी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे आता जेवणासाठी कूपन बंधनकारक करण्यात आले असून कुपन असेल तरच भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

या आधी शिर्डीतील प्रसादालयातील मोफत जेवणासाठी थेट प्रवेश देण्यात येत होता. आता मात्र जेवणासाठी कुपन आवश्यक असणार आहे. हे कुपन मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी कोणतेही शुक्ल आकारले जाणार नाही. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकरयांनी याबाबतची माहिती दिली आहे.

कोट्यवधी साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डी मंदिराच्या संस्थानाने पुन्हा एकदा हा मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डीतील साई मंदिरात दर्शन रांगेसह संस्थानाच्या भक्त निवासात मोफत भोजन कूपन दिले जाणार आहेत. भोजन कुपन त्याच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचसोबत साई संस्थानच्या भक्त निवासात देखील हे कुपन देण्यात येणार आहेत.

यापूव मोफत जेवणासाठी साई संस्थानच्या प्रसादालयात थेट प्रवेश दिला जात होता. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसापूवच माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीतील मोफत जेवणावर टीका केली होती. ते म्हणाले होते, शिड संस्थानातील मोफत जेवणामुळे सगळ्या देशातील भिकारी शिडमध्ये जमा होतात, त्यामुळे गुन्हेगारीमध्ये वाढ होऊन शिडकरांची सुरक्षा धोक्यात येते आहे, असं म्हणत शिर्डी संस्थानाने मोफत जेवण न देता 25 रुपयांमध्ये जेवण द्यावे अशी मागणी सुजय विखे यांनी केली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वारकरी दाम्पत्यावर काळाचा घाला; टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

श्रीगोंदा । नगर सहयाद्री पंढरपूरची वारी करून घरी परतत असताना येळपणे (ता. श्रीगोंदा) येथील...

नगरमध्ये गुटख्याची वाहतूक करणारी टोळी पकडली!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- गुटख्याची वाहतूक करणार्‍या टोळीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष...

वारकऱ्याला काठीने मारहाण; पंढरीत नेमकं काय घडलं?

Maharashtra News: आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांमध्ये आज सकाळी मोठी खळबळ उडाली, जेव्हा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांना संकटांचा सामना करावा लागणार?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...