spot_img
ब्रेकिंगआगामी विधानसभेच्या अनुषंगाने नगर शहर शिवसेनेत मोठा बदल; शहराची जबाबदारी जाधव यांच्या...

आगामी विधानसभेच्या अनुषंगाने नगर शहर शिवसेनेत मोठा बदल; शहराची जबाबदारी जाधव यांच्या खांद्यावर…

spot_img

सुनील चोभे । नगर सहयाद्री
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर शहर शिवसेनेत मोठा बदल करण्यात आला आहे. अहमदनगर शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते यांना नगर शहर प्रमुख पदावरून हटविण्यात आले असून नगर शहराच्या शहर प्रमुखपदी सचिन जाधव यांची शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नियुक्ती केल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. याबाबतचा आदेश 28 जून रोजी काढण्यात आला आहे.

पत्रात म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननिय एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या शहर प्रमुख पदी (कार्यक्षेत्र अहिल्यानगर शहर) नियुक्ती करण्यात येत आहे.

सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असे म्हंटले आहे.

जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांची तयारी सुरु
आगामी तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणूकिसाठी सर्वच पक्षाकडून तयारी चालवली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी तयारी चालवली आहे. विधानसभेला कोणत्या मतदार संघातील जागा कोणाच्या वाट्याला जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...