spot_img
ब्रेकिंगBig Breaking : देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण,...

Big Breaking : देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण, म्हणाला ‘त्यांना’ फाशी द्या…

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली होती. सीआयडीने देखील आरोपीच्या शोधासाठी ९ पथके रवाना केली होती. अशातच कराड स्वःताह सीआयडीला शरण आला आहे. वाल्मिक कराड पुण्याच्या पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण आला आहे. यामुळे आता या प्रकरणात सीआयडी काय चौैकशी करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात देशमुख हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत होते. तसेच दमानिया यांनी देखील तीन आरोपींचा खून झाला असल्याचे माध्यमात सांगून एकच खळबळ उडवून दिली होती. आता कराड सीआयडीला शरण आल्याने चौकशीत कोणते खुलासे करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयासमोर आज सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याने कराड सीआयडीला शरण जाणार असल्याची बोलले जात होते. यामुळेच येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.

पवन ऊर्जा कंपनीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकरणात कराड यांच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहिनुसार, तीन गुन्ह्यांचा तपास सीआयाडी करीत आहे. वाल्मिक कराड यांचे शेवटचे लोकेशन मध्यप्रदेश असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, कराड महाराष्ट्रतच आहे असे सांगण्यात येत होते. आता या प्रकरणात कोणती मोठी माहिती समोर येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, त्यांच्यावर कारवाई करा : मुलगी
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सीआयडीच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. देशमुख यांच्या हत्येनंतर जवळपास 22 दिवसांनी कराडला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याच्यावर पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कराड यांच्या अटकेनंतर देशमुख यांची मुलगी वैभवी हिची प्रतिक्रिया समोर आली. ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तिने केली आहे. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी आहे. पोलीस यंत्रणा काम करतेय मग इतका वेळ का लागतोय? गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय? असे प्रश्न कराड यांच्या अटकेनंतर वैभवीने उपस्थित केले आहेत. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी तिने केली आहे. वैभवी म्हणाली की, ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, त्यांच्यावर कारवाई करा. वडिलांना पुन्हा आणू शकत नाही. माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असतील, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी तिने केली.

दरम्यान, आज वाल्मिक कराड स्वतः पुण्यात सीआयडीला शरण गेला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आले आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या प्रकरणावरून राज्यकीय आरोप-प्रत्योराप पाहायला मिळत आहे. सीआयडीसमोर आत्मसमर्पण करण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

वाल्मिक कराड व्हिडिओत नेमकं काय म्हणाला ?
सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. “मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे.” पुढे त्याने म्हंटले की, “संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे,’ असे वाल्मिक कराडने व्हिडीओत म्हटले आहे.

एकही आरोपी सुटता कामा नये, अन्यथा…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीकडून तपासाला वेग आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांची बँक खाती गोठविण्यात आली असून त्यांच्याशी संबंधित मालमत्तेवर जप्ती आणण्यात येत आहे. तसेच वाल्मिक कराड यांच्या जवळच्या लोकांची सीआयडीकडून चौकशी होत आहे. वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. आता हत्या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा आक्रमकपणे पाठपुरावा करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. प्राजक्ता माळी यांच्याबाबत केलेल्या विधानावर त्यांनी कालच दिलगिरी व्यक्त करून या विषयाला पूर्णविराम लावला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पळसपूरात गावठी दारू अड्डयावर धाडसत्र ! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक

  स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पारनेर / नगर सह्याद्री- तालुक्यातील पळसपूर शिवारातील निर्जन गायरानात सुरू असलेल्या अवैध...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी अनावरण; कोण कोण राहणार उपस्थित पहा

मार्केट यार्ड चौक येथे महानगरपालिकेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन / कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गात...

भयंकर! चालत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये पेशंटवर अत्याचार, कुठे घडला प्रकार पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आली. होमगार्डच्या भरतीसाठी...

लाडकी बहीण योजनेबद्दल अजितदादांकडून मोठी अपडेट; ‘त्या’ महिलांसह पुरुषांना बसणार झटका!

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे,...