spot_img
ब्रेकिंगमोठी ब्रेकिंग ! आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब? मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बस्फोट होतील?

मोठी ब्रेकिंग ! आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब? मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बस्फोट होतील?

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सध्या कुठे काय होईल हे सांगता येणे कठीण आहे. तसेच धमकीचे इमेल पाठवणे देखील अनेक ठिकाणी सुरु आहेत.

नुकतेच अंबानी यांनाही धमकीचे मेल आले होते. आता मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज आला असून यात आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आलीये. आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याचीही धमकी मेलद्वारे दिली गेलीये.

खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेल आयडीवरुन ही धमकी देण्यात आली असून आरबीआयच्या ई-मेल आयडीवर आज सकाळी साडेदहा वाजता हा ई-मेल आला असल्याची माहिती मिळाली आहे. ई-मेलमध्ये आज दुपारी दीड वाजता मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बस्फोट होतील. आम्ही मुंबईतील 11 ठिकाणी हे बॉम्ब ठेवले आहेत,

अशी धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. तसेच गव्हर्नर आणि निर्मला सीतारमण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी ई-मेलमध्ये करण्यात आली आहे. गव्हर्नर आणि निर्मला सीतारमण यांनी राजीनामा न दिल्यास मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली होती अशी माहिती मिळाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...