spot_img
अहमदनगरसत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी मारली. तब्बल २५ वर्षानंतर एकहाती सत्ता काबीज करत सत्ताधारी पुरोगामी सहकारी मंडळाला मोठा धक्का दिला. स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला. सत्ताधारी पुरोगामी सहकारी मंडळ विरोधात स्वाभिमानी परिवर्तन मंडळ अशी सरळ लढत झाली. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीतील 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात उतरले होते.

रविवारी दि. २३ रोजी माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रियेला 94 टक्के प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोमवार दि. २४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांचे नेतृत्वाखाली मतमोजणीसाठी 250 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती होती.

शिक्षकांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणार्‍या माध्यमिक शिक्षक सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया रविवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत शांततेत पार पडली. यंदा पहिल्यांदा ही निवडणूक अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून शिक्षक संघटनांनी निवडणुकीच्या काळात एकमेकांवर जाहीर आरोप करण्याचे टाळत ही निवडणूक त्यांच्या वर्तुळापर्यंत सिमीत ठेवण्यात यश मिळवले असल्याचे समोर आले.

वीजयी उमेदवारांना मिळालेली एकूण मते

१ शिदे अमृतराव उर्फ आप्पासाहेब रामराव – ५२३०

२ दानवे सुनिल दत्तात्रय – ४७२७

३ गुंजाळ उमेश तुकाराम – ४६३८

४ हिंगे महेंद्र गोरक्षनाथ – ४६३७

५ कोतकर राजेंद्र विलासराव – ४६३६

६ कानवडे सुधीर रामभाऊ – ४६२९

७ गाडे संभाजी लक्ष्मण – ४६२६

८. धुमाळ किशोर सयाजी – ४५६२

९ जगताप आप्पासाहेब आनंदराव – ४५०५

१० गायकवाड बाळाजी श्रीधर – ४४१०

११ फुंदे छबू मंजाबापू – ४३८९

१२ रक्टे साहेबराव बाजीराव- ४३५२

१३ लवांडे शिवाजी बापूसाहेब – ४३११

१४ अनभुले बाजीराव रघुनाथ – ४३००

१५ कोताहे अतुल जनार्दन – ४२७५

१६ पठारे विजय सुभाषराव – ४२४८

१७ घाटविसावे सुरज याकोब – ४६२४

१८ बिलारी वर्षा दगडू – ४८९२

१९ दारकुंडे वैशाली श्रीराम – ४८२३

२० वाळके अर्जुन तान्हाजी – ४६३८

२१ बोडखे बाबासाहेब पांडूरंग – ५१२०

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता सुनिल चोभे | नगर सह्याद्री:- आगामी होऊ...

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे....

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार...