spot_img
अहमदनगरमाजी आमदार राहुल जगताप यांना मोठा धक्का; लोखंडे यांचे सभापतीपद रद्द, प्रकरण...

माजी आमदार राहुल जगताप यांना मोठा धक्का; लोखंडे यांचे सभापतीपद रद्द, प्रकरण काय पहा…

spot_img

श्रीगोंदा / नगर सह्याद्री –
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहार केल्याप्रकरणीची चौकशी होऊन त्या आढळून आलेल्या चुकीच्या गोष्टींवर ठपका ठेवत सभापती अतुल उर्फ प्रवीण लोखंडे यांचे सभापतीपदासह संचालक पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा निबंधक गणेश पुरी यांनी पात्रतेचा निर्णय दिला आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ अधिनियम, नियम व त्याखाली केलेल्या मंजूर उपविधी यांचा एकाहून अधिक वेळा भंग केल्याच्या ठपका ठेवत लोखंडे यांना समिती सदस्य तसेच सभासद पदावर अपात्र करण्यात आले. अतुल लोखंडे यांचे सभापती व संचालकपद रद्द झाल्याने हा माजी आमदार राहुल जगताप यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे जगताप यांची बाजार समितीतील सत्ताही धोक्यात आली आहे.

बाजार समितीचे तत्कालीन संचालक शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी बाजार समितीच्या गैरकारभाराबाबत तक्रार करीत संचालक मंडळ बरखास्तीची मागणी केली होती. त्यानुसार चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना दिले होते. त्यानुसार येथील सहायक निबंधक अभिमान थोरात यांनी तक्रारीतील मुद्यांच्या अनुषंगाने चौकशी अहवाल सादर केला.

बाजार समितीच्या हिताचा कारभार केल्याने अनेकजण दुखावले गेले. सहकाऱ्यांशी चर्चा करून अपिलावर जाण्यासंदर्भात पुढील भूमिका ठरवू.
अतुल लोखंडे, सभापती

त्या अहवालात प्राथमिक गरजांऐवजी दुय्यम प्राधान्याच्या गरजांवर खर्च करणे, प्रमाणापेक्षा जास्त रोजंदारी कर्मचारी घेतल्याने बाजार समितीला आर्थिक नुकसान झाले. प्रवास खर्चाबाबत प्रयोजन नमूद नसणे, गाळे धारकांचे नव्याने करारनामे न करणे, हातावर रोख शिल्लक ठेवणे आदी आक्षेप नोंदविले होते.

हा चौकशी अहवाल सादर झाल्यापासून सभापती अतुल लोखंडे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. अखेर शुक्रवारी रोजी जिल्हा निबंधक गणेश पुरी आदेश काढला. या आदेशाने माजी आमदार राहुल जगताप यांना मात्र धक्का बसला असून बाजार समिती त्यांच्या ताब्यातून जावू शकते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...