अहिल्यानगर | नगर सह्याद्री:
आक्रमक नेतृत्व किरण काळे यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना त्यांनी राजीनामा पाठविला आहे. राजीनामा देत काँग्रेस मधून बाहेर पडण्याचे कारण मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. थोरात यांचे निकटवतय सहकारी असणाऱ्या काळेंच्या या निर्णयामुळे मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लवकरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचे काळे यांनी सोशल मीडियातून पोस्टद्वारे म्हटले आहे.

सुमारे साडेचार वर्षांपूव थोरातांनी काळेंच्या खांद्यावर शहर काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा सोपविली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी आलेल्या पटोले यांनी काळे यांची फेरनिवड करत त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली होती. ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी काही काळ काळे यांच्यावर सोपविण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत नगरची जागा काँग्रेसकडे घेत काळेंना उमेदवारी देण्याचे सुतोवाच स्वतः थोरातांनी अनेक वेळा केले होते.
आमदारकीच्या उमेदवारीचा चेहरा म्हणून त्यांना काँग्रेसने शहरात प्रोजेक्ट केले होते. परंतू वाटाघाटीत काँग्रेसला ही जागा सुटली नव्हती. मात्र काळे यांनी त्यांच्या कारकिदमध्ये शहरातील गतप्राण झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी दिली. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. चार दिवसांपूव संगमनेर येथे थोरात यांची समक्ष भेट घेत चर्चा केल्यानंतर काळे यांनी राजीनामा दिला आहे. किरण काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर पत्र लिहीत थोरातांचे आभार मानले आहेत.