अहमदनगर । नगर सहयाद्री-
देशभरात लोकसभा निवडणुकीचा महाकुंभ सजला आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे ३ दिवस बाकी आहेत. एकीकडे निवडणुकीचं मैदान तापलेले असतांनाचा दुसरीकडे नगर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय मानल जातं असणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचा आणि राज्य महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोल्यामधील कृषी नगर भागातील आंबेडकरांच्या यवशंत भवन निवासस्थानी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत १७ एप्रिल रोजी पक्ष प्रवेश केला.
उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसची साथ सोडल्यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघात उडचणी वाढण्याची शक्यता असूनत्यांना वंचितकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असून मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.