spot_img
महाराष्ट्रमोठी कारवाई! 37 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त, 24 जणांवर गुन्हा दाखल,...

मोठी कारवाई! 37 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त, 24 जणांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय?

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील सोनवणे वस्ती येथे अवैध जुगार अड्ड्यावर विशेष पोलिस पथकाने छापा टाकून 37 लाख 58 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी स्वप्नील राजू खेत्रे यांच्यासह 22 जणांना अटक करण्यात आली. तर दोघे फरार झाले. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले.

24 जून रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, स्वप्नील खेत्रे हा सोनवणे वस्तीजवळ हेमंत कोथिंबिरे यांच्या शेडमध्ये तिरट जुगार खेळवतो. पथकाने पंचांसह छापा टाकला असता, 22 जण पत्ते आणि पैशांसह जुगार खेळताना आढळले. पोलिसांना पाहताच काही जण पळाले, परंतु 22 जणांना ताब्यात घेण्यात आले.

अंगझडतीत 2 लाख 22 हजार 800 रुपये रोख, 5 लाख 96 हजार 000 रुपये किमतीचे 20 मोबाईल आणि 28 लाख 90 हजार रुपये किमतीची 9 वाहने जप्त केली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 अन्वये गुन्हा नोंदवला गेला. फरार दिपक मखरे आणि हेमंत कोथिंबिरे यांचा शोध सुरू आहे.

त्याचवेळी, जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत नगर-जामखेड रोडवरील हॉटेल कृष्णा येथे अवैध दारूविक्रीप्रकरणी तुकाराम रामराव डोले (वय 42, रा. सारोळा) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 19 हजार रुपये किमतीचा विदेशी दारू आणि बिअरचा साठा जप्त करण्यात आला. जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘अंतरवाली नियोजन बैठकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात सकल मराठा समाजाची नियोजन बैठक उत्साहात’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री २९ जून २०२५ रोजी अंतरवाली येथे होणाऱ्या राज्यव्यापी मराठा समाजाच्या नियोजन...

गुरुवारी अकरावीचा कट ऑफ; नगरमध्ये अकरावीच्या शेकडो जागा रिक्त राहण्याची शक्यता

पुणे | नगर सह्याद्री अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी राज्यातील 12 लाख 71 हजार 201 विद्याथ्यनी नोंदणी...

माजी मंत्री तनपुरेेंना धक्का; समर्थक अजित पवार गटात

मुंबई | नगर सह्याद्री जिल्ह्यातील राहुरीतील डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन, तसेच बाजार समितीचे...

आमच्या पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेची; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आ. जगताप यांना बोलावणे

अहिल्यानगर । नगर सहयाद्री आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची भूमिका घेत मुस्लिम बांधवांविषयी अपशब्द वापरले....