spot_img
अहमदनगरपोलिसांची मोठी कारवाई! जिल्ह्यात अवैध कारभारावर हातोडा, १०० आरोपी ताब्यात

पोलिसांची मोठी कारवाई! जिल्ह्यात अवैध कारभारावर हातोडा, १०० आरोपी ताब्यात

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यातील विविध हॉटेलांमध्ये बेकायदेशीररीत्या अवैध दारू विकली जात असल्याने स्थानिक गुर्‍हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात अवैध दारु विक्रेत्यांवर छापेमारी केली. त्यात तब्बल ११ लाख ३७ हजार ९६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच १०० आरोपी ताब्यात घेतले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विविध पथके तयार केली. त्यांच्याकरवी जिल्ह्यातील विविध हॉटेलांवर विनापरवाना दारू विक्री करणारे व दारूची वाहतूक करणार्‍या इसमांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून पथके रवाना केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दिनांक ३० मार्च तेदिनांक ०२ एप्रिल २०२४ या कालावधीत एकूण ९५ गुन्हे दाखल केले. त्यात १०० आरोपींच्या ताब्यातून ११ लाख ३७ हजार ९६१ रुपये किमतीची देशी, विदेशी व गावठी हातभट्टीची दारू व एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे.

अवैध दारू विक्री करणार्‍या इसमांविरोधात पोलीस स्टेशननिहाय करण्यात आलेली कारवाई पुढीलप्रमाणे आहे. पहिल्या कंसात पोलिस स्टेशननुसार दाखल गुन्ह्यांची संख्या व दुसर्‍या कंसात आरोपींची संख्या दिलेली आहे. पारनेर (०६) जप्त मुद्देमाल १४९२५ रुपये (आरोपी-०६). पाथर्डी (०८) ३१०९५ (०८). राहुरी (०४) २८०१५ (०४). शेवगाव (१३) ५६००० (१४). घारगाव (०३) १७८७० (०३). लोणी (०२) ३४३० (०२). मिरजगाव (०२) ८६४० (०२). शिर्डी (०२) ४२०० (०२). नेवासा (०४) ६२३० (०४). नगर तालुका (११) १४७१४१ (१२). आश्वी (०५) २२४५० (०५). जामखेड (०८) १२९९६० (०८). सोनई (०४) ५१९१० (०४). संगमनेर तालुका (०४) ७९१० (०५). श्रीरामपूर शहर (०६) २६६८० (०७). कर्जत (१०) ५५८२२० (११). कोतवाली (०२) ११९९२५ (०२). तोफखना (०१) ३३६० (०१). असे एकूण ९५ गुन्हे दाखल असून ११ लाख ३७ हजार ९६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच १०० आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...

तर शिक्षकांनी राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

नागपूर / नगर सह्याद्री - खडतर अर्थात जास्त काठीण्य पातळी असणारी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण...