spot_img
अहमदनगरमोठी कारवाई! ४ वाळूतस्कर अडकले जाळ्यात; प्रवरा नदीपात्रात 'असा' लावला सापळा, जेसिबीने...

मोठी कारवाई! ४ वाळूतस्कर अडकले जाळ्यात; प्रवरा नदीपात्रात ‘असा’ लावला सापळा, जेसिबीने भरलेला ट्रॅक्टर, डंपर हायवा

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) येथे प्रवरा नदीपात्रातून अवैधपणे वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत २८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ४ आरोपी फरार आहेत. तसेच गावठी हातभट्टीची विक्री करणाऱ्या एका महिलेवरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (अहिल्यानगर) यांच्या आदेशानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. २३ जून २०२५ रोजी गुप्त माहितीच्या आधारे चिंचोली परिसरात छापा टाकण्यात आला. त्यावेळी अवैध वाळू उपसा करत ट्रॅक्टर व ट्रॉलीद्वारे वाळू वाहतूक करणारे काही इसम आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी वाहनांसह पळून गेले. मात्र, पथकाने पाठलाग करून ३ आरोपींना ताब्यात घेतले.

कारवाईत एक स्वराज कंपनीचा यारी ट्रॅक्टर, ट्रॉलीसह वाळू भरलेला ट्रॅक्टर, टाटा डंपर, हायवा, जेसीबी तसेच १८ ब्रास वाळू असा एकूण २८ लाख ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत, एकलव्य वसाहत राहुरी येथे एका महिला तिच्या राहत्या घरात गावठी हातभट्टीची दारू साठवून विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने छापा टाकून दारू जप्त केली असून सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे व वैभव कलुबमें, आणि डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकातील पोसई/राजेंद्र वाघ, सफौ शकील शेख, पोहेकों/शंकर चौधरी, पोहेकों अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ अजय साठे, पोहेकों दिगंबर कारखिले, पोहेकों/मल्लिकार्जुन बनकर पोहेकों/दिनेश मोरे, पोहेकॉ उमेश खेडकर, पोकों/सुनिल दिघे, पोकों/अमोल कांबळे, पोकों/जालिंदर दहिफळे यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मैं समंदर हूँ, मै लौटकर वापस आयुंगा!; डॉ. सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याने पारनेरच्या राजकारणात पुन्हा नवा ट्वीस्ट..

विधानसभेची पुनरावृत्ती होण्याचे संकेत | जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुजय विखे यांनी कसली पारनेरमध्ये कंबर राळेगण...

सागर भिंगारदिवेसह साथीदारांवर गुन्हा दाखल! जामिनानंतर ‘ते’ प्रकरण भोवले…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर सागर उत्तम भिंगारदिवे (रा.केडगाव, अहिल्यानगर) याने 70...

मोकळ्या जागेत मर्डर!; पोलिसांचा तपास सुरु, सकाळी-सकाळी उपनगरात काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव उपनगरातील बुलेट शोरूमच्या मागील मोकळ्या जागेत रविवारी (22 जून 2025)...

नगर अर्बनच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी; रक्कम परत मिळणार..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी मोठा दिलासा देणारी अपडेट...