spot_img
महाराष्ट्रभुजबळांचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्याच..

भुजबळांचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्याच..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोगाला कोर्टात आव्हान देऊ असे म्हटले होते. आता यावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका करत जरांगे यांना इशाराच दिला आहे. भुजबळ म्हणाले की, मंडल आयोगाला त्यांनी आव्हान द्यायला हवे.

त्यांच्याएवढा ज्ञानी कुणी नाही. ज्याला लाख आणि कोटी समजत नाही ते मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा करतायेत. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवावे. हे माझे चॅलेंज आहे असा इशाराच मंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजातील जे जाणकार लोक आहेत ते आम्हाला वेगळे आरक्षण द्या, कुणबी म्हणून देऊ नका असे म्हणत आहेत. मराठा आरक्षणासाठी कायदा बनलेला आहे. त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन आहे. मात्र तरीही मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्रे देण्याचं काम सुरू आहे. या झुंडशाहीपुढे नमते घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे त्याला आमचा विरोध आहे.

भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाला धक्का न लागता तुम्हाला ज्यांना आरक्षण द्यायचे आहे ते द्या. पण आमचे आरक्षण कशाला धक्का लावताय?, ते एका मराठा जातीसाठी लढतायेत, मी एका वर्गासाठी लढतोय, जो मागास आहे असं भुजबळांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या हे आम्ही बोलतोय. आमदार ते मंत्र्यांपर्यंत आमची बाजू मांडणे, आमची कैफियत कोर्टात मांडणे, लोकांमध्ये रॅली, आक्रोश करणे, संविधानाने जे काही आम्हाला अधिकार दिलेत त्यानुसार आमच्यावर जो अन्याय होतोय त्याविरोधात आम्ही आयुधे वापरू असं त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...