spot_img
महाराष्ट्रभुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; मुख्यमंत्री शिंदेंनी माझं तिकीट...

भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; मुख्यमंत्री शिंदेंनी माझं तिकीट…

spot_img

नाशिक / नगर सह्याद्री –
राज्यात विधानसभा निवडणूका असल्याने सध्या प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मोठ्या नेत्यांकडून या निवडणुकीदरम्यान अनेक मोठे गौप्यस्फोट केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

लोकसभेला नाशिक मतदारसंघात लढण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रह कायम ठेवल्यानं ही जागा शिवसेनेकडे गेली. याबद्दल आता छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलंय. ते म्हणाले की, मला नाशिकमधून निवडणूक लढवायला भाजप नेत्यांनी सांगितलं होतं, त्यामुळे मी तयारीसुद्धा केली होती.

लोकसभा निवडणुकीवेळी दोन तीन याद्या जारी झाल्या. तरी माझं नाव आलं नाही. जेव्हा मी चौकशी केली तेव्हा या जागेसाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यांचं म्हणणं होतं की, जर शिवसेनेला ही जागा मिळाली तर आजूबाजूच्या चार पाच जागाही ते जिंकतील पण निकाल याच्या उलट लागला. माझं तिकिट एकनाथ शिंदे यांनीच कापलं असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला आहे.

शरद पवार यांनी एका प्रचारसभेवेळी निवृत्तीचे संकेत दिले होते. याबद्दल छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, शरद पवार यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. मला माहितीय की ते घरी बसणाऱ्या लोकांपैकी नाहीत. ते एकही दिवस शांत बसणार नाहीत. याआधीही ते अनेकदा असं बोलले आहेत पण राजकारणातून निवृत्ती घेतली नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वांबोरीचा कारखाना सहकारी केल्यास मी पाठींबा द्यायला तयार ; कर्डिले यांचे रोखठोक मुलाखतीत तनपुरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र

छत्रपती शिवरायांचं नाव हातोड्याने तोडून आजोबाचं नाव दिलं! तो कारखाना बंद पाडून बापाच्या नावानं...

विजयाची फुले पवारांना अर्पण करणार ः प्रणोती जगताप

राहुल जगताप यांच्यासाठी काष्टीत प्रचारफेरी श्रीगोंदा | नगर सह्याद्री महाविकास आघाडीच्या तिकिटाचे दावेदार राहुल जगताप हेच...

घराणेशाहीवर टीका करणार्‍यांची घरात पद घेण्यासाठी धडपड; दातेंची लंकेंवर टीका, काय म्हणाले पहा…

देवीभोयरे परिसरात प्रचारफेरी पारनेर | नगर सह्याद्री - राजकारण, समाजकारणात सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे असून, पारनेर विधानसभा...

सेटलमेंट झाली की ते माघार घेतील अन् एकाला पाठींबा देतील!; विक्रमसिंह पाचपुते यांची विरोधकांना धोबीपछाड देणारी सडेतोड मुलाखत

श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांची विरोधकांना धोबीपछाड देणारी सडेतोड मुलाखत...