spot_img
राजकारणभुजबळांची खायची हाव संपेना, मनोज जरांगे यांनी पुन्हा केला 'हा' मोठा घणाघात

भुजबळांची खायची हाव संपेना, मनोज जरांगे यांनी पुन्हा केला ‘हा’ मोठा घणाघात

spot_img

नेवासा | नगर सह्याद्री :
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गुरुवारी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकारवर हल्ला चढवला. ’मला म्हणत आहे की, माझं पाचवीपर्यंत शिक्षण झालंय. तुम्ही तुरुंगात जाऊन आले, त्यामुळे तुमचा अभ्यास काय कामाचा? अनेक वर्षे आमचं आरक्षण खाल्लं.

त्यांची खाण्याची हाव अद्याप संपलेली नाही. ते राज्याची शांतता बिघडवण्याचं काम करत आहे, असं म्हणत जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर टीका केली. ‘ते जातीय तेढ निर्माण करत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांना समज द्यावी. अन्यथा आम्ही सज्ज झालोय. भुजबळ यांना सरकारचे पाठबळ आहे का? असा सवाल त्यांनी केला.

मनोज जरांगे यांनी नेवासा येथील सभेतून छगन भुजबळांना लक्ष्य केलं. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी राज्यभरात दौरे सुरु केले आहेत. जरांगे गुरुवारी अहमदनगरच्या दौर्‍यावर आहेत.

या दौर्‍यात जरांगे यानी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मंत्री भुजबळांवर टीका केली. जरांगे म्हणाले, ’मराठ्यांच्या लाटेत कुणालाच काही सुचेना. आरक्षण असलेले आणि नसलेले सगळे मराठे एकत्र झाले आहे. चारही बाजूंनी मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण कुणाचे नाव घेत नाही. त्यांची पात्रता नाही. सरकारने मराठा समाजाला गांभीर्याने घ्यावं. आमचे बॅनर फाडले. त्यामुळे अजित पवारांनी त्यांना समज द्यावी. अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल’.

’कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बॅनर फाडले तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आम्हाला उचकवू नका. सरकारने त्यांना शांत केलं नाही, तर सरकार डॅमेज होईल. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी, अन्यथा मराठा बांधव तुमच्या देखील चाव्या काढून घेतील. एकदा पदरात आरक्षण मिळू द्या, मग त्यांच्याकडे बघू. ते अंबडमध्ये येऊन खूप काही बोलून गेले. आरक्षण जवळ आलं आहे, त्यामुळे संयम धरला आहे, असे जरांगे म्हणाले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...