spot_img
महाराष्ट्रभुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? 'हे' आमदार आग्रही

भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? ‘हे’ आमदार आग्रही

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात मराठा आरक्षणाविरोधात मंत्री छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. परंतु आता त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. दोन आमदारांनी त्यांची मंत्रमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. आमदार संजय गायकवाड, संजय शिरसाट या शिंदे गटाच्या आमदारांनी ही मागणी केली आहे.

छगन भुजबळ यांच्या आरक्षण विरोधी भूमिकेमुळे सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे सरकार मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करताना दिसत आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या मागणीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनीदेखील भुजबळांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भूजबळ यांची हकालपट्टी करा. कशाला लाड करता? याला आधी बाहेर काढा, असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं आहे. तर संजय शिरसाट यांनीदेखील भुजबळांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे.

भूजबळ यांच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सहमत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतलीय. ज्या मराठ्यांनी हा देश वाचवला त्यांच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही. एका मंत्र्याच्या विरोधाने सरकारला फरक पडत नाही, मी खुलेआम सांगतोय. त्यांच्या राजीनाम्याने ना सरकारला फरक पडणार आणि ना एनसीपीला अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...