spot_img
अहमदनगरउड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावणे भोवले, महापालिका आक्रमक, घेतली ही भूमिका

उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावणे भोवले, महापालिका आक्रमक, घेतली ही भूमिका

spot_img

विनापरवाना फलक, पोस्टर्स तत्काळ काढून घ्यावेत, आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आदेश
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील त्यांच्या जीवनातील प्रसंगचित्रे रेखाटण्यात आली आहेत. या ठिकाणी महानगरपालिकेकडून जाहिराती, फलक लावण्यास परवानगी दिली जात नाही, हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही, या पिलरवर विनापरवाना जाहिरातबाजी करून त्याचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. या प्रकरणी महानगरपालिकेने कठोर कारवाई करत जाहिरातबाजी करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

मार्केटयार्ड चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरवर जाहिरात पोस्टर लावल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांना मिळाली होती. त्यांनी प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांना आदेश देत तत्काळ तपासणी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. प्रभाग अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता “राजलक्ष्मी वास्तू डेव्हलपर्स निर्मीत श्रीकृष्ण पार्क, शिक्रापुर येथे रोडटच प्लॉटस, पुणे-नगर हायवेपासुन एक मिनीट अंतरावर १ लाख ९९ हजार रुपये भरुन जागेचे मालक व्हा, बुकिंग १०,०००/- सुलभ हफ्त्यांची सोय” अशा आशयाचे जाहिरातीचे पोस्टर लावून विद्रुपीकरण केल्याचे समोर आले. सदरचे स्किमचे मालक विशाल गवारे (रा. खराडी बायपास बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, तिसरा मजला, पुणे) हे आहेत. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी पंचनामा करून विशाल गवारे याच्या विरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

शहरात विनापरवाना पोस्टर व फलक लावण्यात आल्याबाबत तत्काळ तपासणी करावी. विनापरवाना फलक, पोस्टर आढळल्यास तत्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी सर्व प्रभाग समिती अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरात ज्यांनी विनापरवाना फलक पोस्टर्स लावले आहेत, त्यांनी ते तत्काळ हटवून घ्यावेत, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हाॅटेल-रेस्टॉरंटमध्ये ‘सर्व्हिस चार्ज’बाबत दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - दिल्ली हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आता हाॅटेल...

लाडकीला २१०० रुपये कधी देणार? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई / नगर सह्याद्री - महायुतीने विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणींना योजनेतून महिना २१०० रुपये देणार...

सरकार काय बोळ्याने दूध पितं का?; सरकारवर जोरदार टीका, खासदार उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?

मुंबई । नगर सहयाद्री:- भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अमाध्यमांशी संवाद साधत...

श्रीरामनवमी मिरवणूकीत अडथळा आणल्यास बंद पुकारणार; आमदार जगताप यांचा प्रशासनाला इशारा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री यंदाची श्रीरामनवमी मिरवणूक अहिल्यानगर शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने उत्साहात...