अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६७ व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंयपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत २०२४-२५ लढत दिनांक २९ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान वाडियापार्क मैदान, अहिल्यानगर येथे होत आहेत. सदर महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२४-२५ साठी नियोजीत स्थळी मैदानाचा भूमी पूजन समारंभ केंद्रीय राज्यमंत्री पै. मुस्लीधर (आण्णा) मोहोळ यांच्या हस्ते सोमवार, दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वाडियापार्क क्रीडा संकुल, अहिल्यानगर येथे होणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार संगाम जगताप यांनी दिली.
सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. रामदास तडस, कार्याध्यक्ष पै. संदिप (आप्पा) भोंडवे, सरचिटणीस हिंद केसरी पै. योगेश दोडके, आ. शिवाजीराव कर्डिले, माजी आ. अरुणकाका जगताप, पै. सचिन जगताप, उपाध्यक्ष पै. अर्जुन (देवा) शेळके, उपाध्यक्ष पै. स्वींद्र वाघ, महाराष्ट्र केसरी पै. अशोक भाऊ शिर्के, महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे, उप महाराष्ट्र केसरी बबन काशीद, उप महाराष्ट्र केसरी बापू थेटे, सचिव प्रा. डॉ. पै. संतोष भुजबळ, सह सचिव पै. प्रविण घुले, स्वजिनदार पै. शिवाजी चव्हाण, उत्तर महाराष्ट्र केसरी पै. युवराज करंजुले, पै. शिवाजी कराळे, पै. उमेश भागानगरे, पै. पांडुरंग गुंजाळ, पै. नितीन काकडे, पै. शंकर खोसे, पै. प्रमोद गोडसे, पै. संदिप कावरे, पै. धनंजय खरों, पै. अतुल कावळे, पै. मोहन गुंजाळ, पै. निलेश मदने, पै. संजय (काका) शेळके, पैं. संदीप कावरे, महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, जिल्हा व राज्यभरातून आलेले सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. भूमी पूजन समारंभा प्रसंगी सर्व कुस्तीगीरांनी, वस्ताद मंडळी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक तथा अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ. संग्राम जगताप, सचिव डॉ. संतोष भुजबळ व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.