spot_img
अहमदनगरभंडारदरा धरण भरले; मुळा नदीत ८३७३ युसेसने सोडले पाणी

भंडारदरा धरण भरले; मुळा नदीत ८३७३ युसेसने सोडले पाणी

spot_img

अकोले | नगर सह्याद्री
पाणलोटात गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा जोर वाढल्याने धरणात शनिवारी नव्याने पाण्याची जोमाने वाढ होत आहे. परिणामी ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा १०५२० दलघफू झाला असून काल सायंकाळी विसर्ग ७४२०युसेकने प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे निळवंडे धरणातीलही पाणीसाठा वेगाने वाढत असून आज हा पाणीसाठा ६५ टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. दरम्यान, १०६० दलघफू क्षमतेचे आढळा धरणही भरले असून ४० युसेकने विसर्ग सुरू आहे.

शुक्रवारी रात्री १२ तासांत धरणात नव्याने २७७ दलघफू पाणी आल्याने भंडारदरातील पाणीसाठा १०३६३ दलघफू होता. त्यामुळे विसर्ग १९२८ युसेकने सुरू होता. पण पाऊस सुरू असल्याने आणि आवक वाढल्याने सायंकाळी धरणातील पाणीसाठ १०५२० दलघफू कायम ठेवून सायंकाळी ६ वा. ४७११ युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. त्यानंतर आषाढ सरी जोरदार कोसळत असल्याने सायंकाळी ७ वाजता ७४२० युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. परिणामी निळवंडे धरणाचा साठा तासागणिक वाढू लागल आहे.

सायंकाळी निळवंडेतील पाणीसाठा ६०.४० टक्के झाला होता. पण त्यानंतर आवक आणखी वाढल्याने आज शनिवारी या धरणातील पाणीसाठा ६५ टक्क्यांच्या पुढे जाण्याची शयता आहे. गत २४ तासांत नोंदवला गेलेला पाऊस असा-मिमी. भंडारदरा- ५२, घाटघर ९७, रतनवाडी ९३, पांजरे ८५. काल दिवसभरात भंडारदरात पडलेल्या पावसाची नोंद ५२ मिमी झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...