spot_img
अहमदनगर१२ तासात भामटा जेरबंद! नगर तालुका पोलिसांची मोठी कारवाई

१२ तासात भामटा जेरबंद! नगर तालुका पोलिसांची मोठी कारवाई

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
दहिगाव (ता.नगर) येथील श्रीराम मंदिरांची दानपेटी फोडणाऱ्या आरोपींला १२ तासाच्या आत जेरबंद करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार (दि.४) रोजी रात्री चोरटयांनी श्रीराम मंदिरांची दानपेटी फोडून दानपेटीतील रक्कम पळवली. याबाबत श्रीराम मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष नागेश तुळशिराम वाघ (रा-दहीगाव, ता. जि अहिल्यानगर) यांनी नगर तालुका पोलिसांत फिर्याद दिली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहणी केली. गुरुवार (दि.५) रोजी तपासासाठी एक पथक तयार करून १२ तासाच्या आत तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्याचा तातडीने तपास लावला. आरोपी गणेश सोन्याबापू हंबर्डे ( रा. दहिगाव ता. जि. अहिल्यानगर ) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता,त्याने गुन्ह्यांची कबूली दिली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद वांडेकर, गणेश लबडे, नगर दक्षिण मोबाईल सेल विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे आदींच्या पथकाने बजावली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खरे असणारे दीड किलो सोने बनावट कसे झाले?: बाबासाहेब तांबे

गोरेश्वर पतसंस्था बाजीराव पानमंद व कुटुंबाने खासगी प्रॉपट असल्यागत चालवल्यानेच ही संस्था अडचणीत आली! पारनेर...

शिवसेना-मनसे युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; आता थेट…

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे...

27 केंद्रांना कृषी विभागाचा दणका; किती परवाने केले निलंबित?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री खरीप हंगाम 2025 अनुषंगाने कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची व्यापक...

मनपा, झेडपीसाठी शिंदे सेना सज्ज; शनिवारी नगरमध्ये मेळावा

संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे...