spot_img
अहमदनगरसावधान! राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार: 'या' भागाला यलो अलर्ट

सावधान! राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार: ‘या’ भागाला यलो अलर्ट

spot_img

Maharashtra Rain Update :राज्याच्या काही भागात पावसानं धुमाकूळ घातचला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. त्यातच आज हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातच आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत करण्याची मागणी
गेल्या काही दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल तेवढी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील सरकारनं आम्हाला मदत करावी अशी मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...