spot_img
ब्रेकिंगसावधान! जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे उघडले; 'या' नदीला मोठा पूर

सावधान! जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे उघडले; ‘या’ नदीला मोठा पूर

spot_img

छत्रपती संभाजी नगर | नगर सह्याद्री:-
मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण तब्बल ९७.३० टक्के भरलं असून सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ०.५ फुटाने धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सध्या जायकवाडी धरणातून गोदापात्रात ३१४४ युसेस इतया वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती पाठबंधारे विभागाने दिली आहे. यंदा नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी जुलै महिन्यात अवघ्या ६ टक्क्यांवर असलेलं जायकवाडी धरण सोमवारी सप्टेंबर महिन्यात ९० टक्क्यांहून अधिक भरले. सोमवारी सकाळी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल ९८ टक्के इतका झाला होता.

धरणात १५ हजार १४१ युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले होते. त्याचबरोबर कोणत्याही क्षणी गोदापात्रात पाणी सोडले जाईल, असं पाठबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं होतं. यापार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता.सोमवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सध्या धरणाचे ६ दरवाजे ०.५ फुटाने उघडण्यात आले आहे.

परिणामी गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. सध्या धरणातून ३१४४ युसेस इतया वेगाने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.दरम्यान, पावसाळ्याचा हंगाम अजूनही १ महिना शिल्लक असून मराठवाड्यात जोरदार पावसाची शयता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात येणार्‍या पाण्याची आवक वाढली तर गोदावरी नदीत आणखी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असं पाठबंधारे विभागाने स्पष्ट केलं आहे. तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

परभणीत राहुल गांधींचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले पहा

परभणी / नगर सह्याद्री - सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून राज्यातील राजकारण तापलंय. सूर्यवंशी यांच्या...

पुणतांब्यात धार्मिक स्थळी तोडफोड; ग्रामस्थ आक्रमक

राहता । नगर सहयाद्री:- राहता तालुक्यातील पुणतांबा गावात अज्ञात समाजकंटकांनी एका धार्मिकस्थळी तोडफोड केल्याची घटना...

Weather Update: हवामान बिघडलं! हिवाळ्यात पावसाळा; हवामान विभागाकडून अलर्ट

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच राज्यात पाऊस बरसणार असल्याची...

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ; प्रकरणात नवा ट्विस्ट? वाचा सविस्तर

IAS Pooja Khedkar News: बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून आयएएस पद गमावलेल्या IAS अधिकारी...