Maharashtra News ; मकर संक्रात अवघ्या काही दिवसांवर आहे,त्यामुळे पतंगोत्सवाची तयारी सर्वत्र सुरु आहे. आतापासूनच आकाशात विविदरंगी पतंग पाहायला मिळतायत. मात्र तुम्ही नायलॉनचा मांजा वापरत असाल तर सावधान,काय आहे याचं कारण पाहू.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या सणानिमित्ताने देशभरात पतंग उडवण्याची स्पर्धा रंगते. मात्र या पतंगबाजीसाठी वापरला जाणारा नायलॉनचा मांजा अनेकांसाठी जीवघेणा ठरतोय, तर या मांजामुळे अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय, त्यामुळे सरकारने नायलॉन मांजावर बंदी घातलीय.
मात्र त्यानंतरही दुकानदारांकडून नायलॉनचा मांजा सर्रास वापरला जातोय.त्या पार्श्वभुमीवर पोलीस अॅक्शन मोडवर आलेत, नायलॉनचा मांजा विकणाऱ्यांविरोधात आणि वापरणाऱ्या मुलांच्या पालकांविरोधात पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारत भारतीय न्याय संहितेच्या ११० कलमांतर्गत थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीसांनी दिला आहे.
त्यामुळे मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, मात्र नायलॉन मांजा किती घातक आहे? पाहूयात. मकर संक्रातीचा सणाच्या निमित्ताने पतंग काटण्याची स्पर्धा रंगते, मात्र तुमचा आनंद एखाद्याचं आयुष्य उध्वस्त करू शकतो. त्यामुळे न्यायालयाचे निर्देश, पोलीसांची कारवाई लक्षात घेऊन नायलॉन मांजा वापरणं टाळा,नाहीतर गुन्हा दाखल होऊन तुमचं आयुष्य उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.