अहमदनगर | नगर सह्याद्री
पुढील चार दिवसांत अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या चमचमाटासह वादळी वारे वाहतील तर काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.
दिनांक ०३ ते ०७ जूनपर्यंत हा हवामानाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार नगर जिल्ह्यात ०३ जून रोजी एक दोन ठिकाणी वादळी वारे वाहतील व विजांच्या चमचमाट होईल. ०४ जून रोजी एकदोन ठिकाणी वादळी वार्यासह मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे.
काही भागात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने कोरडे वारे वाहतील. ०५, ०६ आणि ०७ जून रोजी जिल्ह्याच्या तुरळक एक दोन भागात, विजेच्या चमचमाटास वादळी वारे वाहतील.