spot_img
ब्रेकिंगसावधान! अपात्र लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी; दंडात्मक कारवाई होणार? आदिती तटकरेंनी काय...

सावधान! अपात्र लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी; दंडात्मक कारवाई होणार? आदिती तटकरेंनी काय सांगितल…

spot_img

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक चर्चा सुरु झाल्या आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु लाडकी बहीण योजनेत अपात्र असूनही लाभ घेतलेल्या महिलांकडून दंड वसूल करणार असल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र, असं काहीही होणार नसल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेत दिलेले पैसे परत घेण्याचा कोणताही विचार नसला तरी यापुढे निकषात बसणाऱ्या लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत लाखो महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.या महिलांकडून पैसे सरकारकडून परस्पर काढून घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी दिले आहे. लाभार्थी महिलांकडून परस्पर पैसे परत घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.परंतु जर तुम्ही निकषात बसत नसाल तर स्वतः हून पैसे परत करावेत,असं आमचे आवाहन आहे. पैसे करत करण्यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक टाकली आहे. अनेक महिलांनी आम्हाला पैसे परत केले आहेत.

या योजनेत नव्याने कोणतेही निकष तयार केले जाणार नाही.जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना हप्ता दिला जाईल. यावेळी लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बीड नाय? बिहारच! ‘या’ तीन घटनांमुळे खळबळ; पुन्हा गोळीबार

  Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी...

एस. पी. राकेश ओला यांनी काढले आदेश; 20 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात अकार्यकारी पदावर बदली केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक...

‘नगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक कराटेचा महामुकाबला’; भिडणार ‘इतके’ खेळाडू

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025...

बाप रे! १० लाखांचे घेतले ‘एवढे’; सावकारकीचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री उद्योजक महेश सुरेश गावडे (वय 30 रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांचे...