मुंबई । नगर सहयाद्री
एकीकडे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन करत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे विदर्भासह कोकण आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर भारतातील अनेक राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये पुढील ५ दिवस हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये उष्णतेची लाट आहे. काल उष्णतेमुळे राजस्थानमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसासाचा येलो अलर्ट
नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, नगर, पुणे, अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तर सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.