spot_img
अहमदनगरसावधान! विनापरवाना पोस्टर्स लावणाऱ्यावर 'ती' कारवाई होणार

सावधान! विनापरवाना पोस्टर्स लावणाऱ्यावर ‘ती’ कारवाई होणार

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरात विनापरवाना भिंतीवर, सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्वच्छता मोहिमेत ही बाब समोर आली होती. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्वतःहून असे पोस्टर्स काढून घेतले. आता विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार शहर प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अहिल्यानगर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान राबविले. यावेळी माळीवाडा बसस्थानक परीसरातील पुलाखालील पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या इतिहासातील चित्र रेखाटलेले असलेल्या ठिकाणी आर्य करिअर अॅकडमी पोलिस भरती स्पेशल बॅच संगमनेर यांच्या जाहिरातीचे पोस्टर लावल्याचे समोर आले. सुनिल खंडेराव फंटागरे (रा. आर्य रेसिडेंन्शियल ब्रँच, सुधीर हॉटेल मागे, सायखिंडी फाटा, संगमनेर) यांच्यामार्फत हे पोस्टर्स विनापरवाना लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पंचनामा करण्यात आला. त्यानुसार सुनिल खंडेराव फंटागरे यांच्याविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनापरवाना सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करू नये. अशा पद्धतीने विद्रुपीकरण करणाऱ्यांवर यापुढे फौजदारी कारवाई केली जाणार आहे. सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जाहिरात कंपन्यांनीही याची खबरदारी घ्यावी. विद्रुपीकरण केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...