spot_img
अहमदनगरअजितदादांशी गद्दारी; दहशतीला खतपाणी घातल्याने निलेश लंकेंवर पारनेरकर नाराज

अजितदादांशी गद्दारी; दहशतीला खतपाणी घातल्याने निलेश लंकेंवर पारनेरकर नाराज

spot_img

भाजप तालुकाअध्यक्ष राहुल शिंदे यांचा घणाघात / लोकसभा निवडणूक लढवू नये असे सांगत केली उमेदवारी
पारनेर / नगर सह्याद्री –
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आमदार असताना तालुक्याच्या कुठल्याही प्रश्नांची सोडवणूक केली नाही. केवळ दहशतीला खतपाणी घालण्याचे काम त्यांनी आपल्या बगल बच्च्यांमार्फत केले. यामुळे मतदार संघातील जनता त्यांना कोणताही थारा देणार नाही असा घणाघात पारनेरचे भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला. त्यात त्यांनी केवळ उमेदवारीसाठी अजित पवारांशी केलेल्या गद्दारीमुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत असेही शिंदे म्हणाले.

लंके आपल्या आमदारकीच्या काळात केवळ आश्वासने दिली. प्रशासनाला वेठीस धरून केवळ आपल्या आसपासच्या लोकांचा त्यांनी उद्धार केला. कोणतीही ठोस कामे त्यांनी केली नसल्याने मतदारांचा कौल महायुतीच्या उमेदवाराकडे असल्याचे राहूल शिंदे यांनी सांगितले.

पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोविड काळात केलेल्या नौटंकीचा पर्दाफाश आता झाला आहे. सरकारचे अनुदान घेऊन कोवीड सेंटरच्या माध्यमातून श्रेय लाटण्याचे काम त्यांनी केले. एकीकडे जनता कोविड संकटाने त्रस्त झाली असताना लंके मात्र या संकटातून स्वताला प्रसिद्धी मिळविण्यात दंग होते. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. ही बाब मतदार संघातील जनतेला रुचलेली नाही. त्या कोवीड रुग्णालयाचे सत्य माध्यमांनी समोर आल्याने लोकांच्या मनात लंके यांच्या विरोधात प्रचंड चिड निर्माण झाली आहे.

आधीच लोकांनी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरू नये असे सांगत असताना लंके यांनी केवळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादांची साथ सोडली सहा महिन्यात त्यांनी अजित पवारांशी गद्दारी केली. यामुळे मतदार संघातील लोकांचा विश्वास कसा संपादन करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार यांनी कोविड काळात आपल्या रुग्णालयात लोकांची मोफत सेवा केली. त्याचबरोबर जिल्हाभर आरोग्य शिबीरे राबऊन लोकांना सहकार्य केले. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमिडिअरचा तुटवडा असताना त्यांनी जिल्ह्यात शर्तीचे प्रयत्न करत हा पुरवठा कायम ठेवला. पण याची कुठेही प्रसिद्धी केली नाही. कोणता पुरस्कार मिळावा यासाठी आटापिटा केला नाही. या सर्व सेवाभावी कार्याची सहानभूती डॉ. सुजय विखे पाटील यांना निश्चित मिळेल असा विश्वास यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...