spot_img
अहमदनगर९२ हजार रुपयांची सुपारी, चौघांना घडणार जेलची वारी! महिलेच्या मृतदेहाचे नगर कनेक्शन?

९२ हजार रुपयांची सुपारी, चौघांना घडणार जेलची वारी! महिलेच्या मृतदेहाचे नगर कनेक्शन?

spot_img

Crime News: परंडा तालुक्यातील सोनारी शिवारात आढळलेलया महिलेचे मृतदेहाचा धक्कादायक उलघडा समोर आला आहे.अनैतिक संबंधातून महिलेची हत्या करण्यात आली. याप्रकणी महिलेची सुपारी घेणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघांना पोलिसांनी बेडया ठोकल्या आहे.

अधिक माहिती अशी: 30 वर्षीय महिलेचा मृतदेह सोनारी येथील शिवारात दि. १७ नोव्हेंबर रोजी आढळला होता. या महिलेच्या डाव्या हातावर ‘प्रकाश’ असे नाव गोंदले होते. तिच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. तर तिला पुलावरुन पाण्यात फेकण्यात आले होते. या प्रकरणी रामकिसन दगडू कुंभार यांनी माहिती दिल्यानंतर अकस्मात मृत्युचा गुन्हा नोंद झाला होता.

त्यातच कोणताच पुरावाही नसल्याने पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी यासाठी खास तपास पथक स्थापन केले. त्यानंतर लागलीच पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु केली. यात एक कार संशयास्पद असल्याचे समोर आले. त्या कारचा माग काढत पोलीस अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील पढेगावपर्यंत पोहोचले. तेथून कारचालक संदीप तोरणे (वय 34) याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांना माहिती मिळाली. संबंधित मृत महिलेचे श्रीरामपूर येथील विश्वास झरे याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यातून ती झरे याच्याकडे सातत्याने पैसे मागायची. या त्रासाला कंटाळून झरे याने तोरणे तसेच सोमनाथ कराळे (वय 27), महेश जाधव (वय 19) यांना 92 हजार रुपयांची सुपारी दिली.
या तिघांनी या महिलेला 16 नोव्हेंबरला रात्री तुळजापूरला देवदर्शनाला जायचे आहे असे सांगून गाडीत घेतले.

तिला नेवासा फाट्यावरुन घोडेगाव, नगर, कडा, आष्टी, जामखेड, खर्डा, आंबीमार्गे सोनारी गावाजवळील पुलावर आणले. तिथे तिचा गळा आवळून डोक्यात दगड घालून खून केला. हरण ओढा पुलावरुन खाली फेकून देण्यात आले. पोलिसांनी इतर तिघांनाही सोनई येथील (ता. नेवासा) वंजारवाडी शिवारातून अटक केली

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...