spot_img
अहमदनगरसामाजिक कार्यकर्त्यांला खंडपीठाचा दणका; मनपाच्या विरोधातील 'ती' याचिका फेटाळली

सामाजिक कार्यकर्त्यांला खंडपीठाचा दणका; मनपाच्या विरोधातील ‘ती’ याचिका फेटाळली

spot_img

महापालिकेच्या नूतन हॉस्पिटल विरोधातील याचिका फेटाळली | याचिकाकर्ते हेमंत ढगे यांना १० हजारांचा दंड
अहमदनगर । नगर सहयाद्री:-
सर्वसामान्य गरीब आणि गांजलेल्या रुग्णांंना अद्ययावत सुविधा आणि उपचार मिळावेत यासाठी बुरूडगाव रोड परिसर येथे अहमदनगर महापालिकेने बांधकामास सुरुवात केलेल्या अद्ययावत अशा रुग्णालयाविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. किशोर सी. संत यांनी फेटाळून लावली असून याचिकाकर्ते असलेले सामाजिक कार्यकर्ते हेमंत ढगे यांनी दाव्याच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरण्याचे आदेश दिला आहे.

महापालिकेने बुरूडगाव रोड परिसर येथील रुग्णालय बांधण्यासाठी प्रसारित केलेल्या निविदेतील इस्टिमेटपेक्षा चार टक्के जास्तीची रक्कम संबंधित बांधकाम ठेकेदाराला दिली असून जनतेचा पैसा असा का जास्तीचा दिला असा प्रश्न करून रुग्णालयाचे बांधकाम थांबवावे असे हेमंत ढगे यांंनी याचिकेत म्हटले होते. तेव्हा खंडपीठाने आपल्या निकालात म्हटले आहे, की घटनेच्या कलम २२६ मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे, जनतेच्या हितासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासन यांना असे रुग्णालय बांधण्याचा पूर्ण अधिकार आहे. विशेष म्हणजे १२ जानेवारी २०२२ रोजी महापालिकेने सभेत तसा ठराव मंजूर केला व जिल्हाधिकार्‍यांनी त्या ठरावास मान्यता दिल्यानंतर रुग्णालयाच्या बांधकामास मान्यता दिली. त्यानुसार बांधकाम सुरू करण्यात आले.

अहमदनगर महापालिकेच्या या रुग्णालय बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात मे. स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर यांची एक आणि मे. गांधी कन्स्ट्रक्शन्स यांची एक अशा दोन निविदा आल्या होत्या. त्यातील मे. स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर ची निविदा ही महापालिकेच्या इस्टिमेटपेक्षा १५ टक्के जास्त दराची होती. त्यात संपूर्ण खर्च रक्कम २३ कोटी ८४ लाख ३४ हजार २३८ रुपये दाखविला होता. मे. गांधी कन्स्ट्रक्शन्स ची निविदा ही इस्टिमेटपेक्षा ०९.९९ टक्के जास्त दराची होती. मनपाने जास्त असलेल्या मे. स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चरला मागे सारून कमी दराच्या असलेल्या मे. गांधी कन्स्ट्रक्शन्सशी बोलणी सुरू केली. बर्‍याच वाटाघाटीनंतर गांधी कन्स्ट्रक्शन्स ने इस्टिमेटपेक्षा ०९.९९ टक्के जास्त असलेल्या रकमेवरून खाली येत ०५ टक्के रक्कम कमी केली. त्यामुळे इस्टिमेटपेक्षा ०४ टक्के जास्त रक्कम असलेल्या गांधी कन्स्ट्रक्शन्सला रुग्णालयाचे बांधकाम करण्याचा ठेका देण्यात आला.

यात जास्तीचे पैसे दिले गेल्याचा याचिकाकर्त्याचे म्हणणे वास्तवाला धरून नसल्याने व रुग्णालयाचे बांधकामही ३५ टक्क्यांच्या वर झालेले आहे, अशा वेळी त्या बांधकामाला स्थगिती देणे संयुक्तिक ठरत नाही असे म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. या दाव्यापोटी झालेला खर्च १० हजार रुपये भरण्याचे आदेशही मुख्य न्यायमूती श्री. संत यांनी दिले आहेत.

मुंबईनंतर नगरमध्ये होणार
महापालिकेचे अद्ययावत हॉस्पिटल
राज्यात मुंबई महापालिकेनंतर अहमदनगर महापालिकेच्यावतीने नगरमध्ये १५० बेडचे अद्ययावत हॉस्पिटलचे काम सुरु आहे. बुरुडगाव रोड परिसरात १५० बेडचे, तीन ऑपरेशन थेटर असलेल्या हॉस्पिटलचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. गोरगरिब रुग्णांसाठी हे हॉस्पिटल तातडीने उभा रहावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठे परिश्रम घेतले असून त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे भव्य हॉस्पिटलची इमारत पूर्णत्वाकडे जात आहे. हॉस्पिटलचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्यांचा आरोग्य सेवेचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये चाललंय काय? पोलिसांची गुंडागिरी?, दुकानदाराला मारहाण!, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील कोल्हार गावात एका पोलीस हवालदाराने दुकान बंद करण्याच्या...

आजचे राशी भविष्य! आजचा दिवस नवीन यशांनी भरलेला, वाचा कोणाच्या आयुष्यात येणार भरभराट?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे...

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर रेल्वेस्थानक, रेल्वेस्टेशनचेही नाव बदलले, सरकारकडून प्रक्रिया पूर्ण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे....

तयारीला लागा! जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या आरक्षणाचा फुगा फुटला, अनेक दिग्गजांना मोठा धक्का, कुठे काय निघाले आरक्षण पहा

अहिल्यानगर झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव / जिल्ह्यातील दिग्गजांना मोठा धक्का | राज्यातील...