spot_img
अहमदनगरकोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी कारवाई केली. एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकून पोलिसांनी १८० किलो गोमांस, मांस कापण्याची मशिन आणि इतर साहित्य असा एकूण ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ५२ वर्षीय अबिद बाबुलाल कुरेशी (रा. कोठला, अहिल्यानगर ) याला अटक करण्यात आली आहे.

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भांबळ यांना बुधवारी (दि. १२) गुप्त बातमीदाराकडून कोठला झोपडपट्टीत, कुरेशी नाष्टा सेंटरजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, बाळासाहेब भापसे आणि फिर्यादी अविनाश बर्डे यांच्या पथकाने दोन पंचांसह दुपारी १२ वाजेच्या सुमारास छापा टाकला. घटनास्थळी एक इसम मांस तोडताना आढळला.

चौकशीत त्याने आपले नाव अबिद बाबुलाल कुरेशी, असे सांगितले. घटनास्थळावरून ३६ हजार रुपये किमतीचे १८० किलो गोमांस, २० हजार रुपयांचे इलेक्ट्रिक मांस कटिंग मशिन, वजनी काटा, सत्तुर आणि सुरा असा एकूण ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश अशोक बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अबिद कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार तनवीर शेख करत आहेत.

बनावट इन्स्टाग्राम प्रोफाईलवर फुल सर्विसचा मेसेज
सोशल मीडियावरून महिलांची बदनामी करण्याचा एक धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. एका ३० वर्षीय महिलेचे फोटो चोरून तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले गेले. त्यावरून फुल सर्विस अशा अश्लील मेसेजसह तिचा वैयक्तिक मोबाईल नंबर प्रसारित केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या पूर्वी, आरोपीने मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून पीडित महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडले. आरोपीने या अकाउंटवर फिर्यादी महिलेचे फोटो वापरले आणि अश्लील मेसेज पोस्ट केले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने फुल सर्विसअसा शब्दप्रयोग करून पीडित महिलेचा खरा मोबाईल नंबर त्या प्रोफाइलवर टाकला. या प्रकारामुळे पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला. बुधवारी (दि. १२) पीडित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण हकिगत सांगितली आणि कायदेशीर फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर एल. पेंदाम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. संबंधित मोबाईल क्रमांक आणि इन्स्टाग्राम अकाउंटच्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

भिंगारमध्ये महिलेला मारहाण
भिंगार हायस्कूलमध्ये मुलाच्या झालेल्या भांडणाचा राग धरून एका ३७ वर्षीय महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. पीडित महिलेने बुधवार (दि. १२) रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी फैजान (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पीडित महिला आलमगीर परिसरात राहते. त्यांच्या मुलाचे भिंगार हायस्कूलमध्ये भांडण झाले होते आणि याचाच राग आरोपी फैजान याच्या मनात होता. दिनांक ६ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास, आरोपी फैजान यांनी महिलेला गाठून शिवीगाळ सुरू केली. नंतर त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने १२ नोव्हेंबर रोजी कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार डी. पी. शिंदे करत आहेत.

गृहकर्जाच्या बहाण्याने प्राध्यापकाची फसवणूक
एलआयसीमधून गृहकर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने प्राध्यापकाची अडीच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रा. सुधीर रामचंद्र बळे (वय ५३, रा. सुप्रिया अपार्टमेंट, पुनम मोतीनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चेतन दत्तात्रय दांडेकर (रा. पुणे) यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा. सुधीर बळे यांनी वाघोली, पुणे येथे फ्लॅट खरेदी करण्यासाठी दांडेकर यांच्याकडून गृहकर्ज मंजूर करून घेण्याची मागणी केली होती. दांडेकरने काही कोरे चेक आणि कागदपत्रे मागितली आणि प्रकरण करण्यासाठी ५० हजार रुपये मागितले. विश्वासाने प्रा. बळे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे चार कोरे चेक आणि ५० हजार रुपये ऑनलाईन स्वरूपात दिले. मात्र, काही आठवड्यांनीही कर्ज मंजूर झाले नाही. पैशाची तातडीने आवश्यकता असल्याने प्रा. बळे यांनी दुसऱ्या कर्जाचा मार्ग अवलंब केला आणि दांडेकरकडून दिलेली रक्कम परत मागितली. यावर दांडेकरने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रा. बळे यांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये डेबिट झाल्याचे समोर आले. चौकशी केल्यावर समजले की, दांडेकरने बळे यांचा एक कोरा चेक चिंचवड, पुणे येथील डीसीबी बँकेत जमा करून ही रक्कम काढली. फसवणूक लक्षात येताच प्रा. बळे यांनी दांडेकरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद लागल्याचे समोर आले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...

बिबट्या ठार मारा; तरच चिमुकलीवर अंत्यसंस्कार, खारे कर्जुने ग्रामस्थांचा गाव बंदचा निर्णय

खारे कर्जुने ग्रामस्थांचा निर्णय | गाव बंद | शाळा, महाविद्यालय बंद | बिबट्यांनी हादरवला...

अरणगाव शिवारात शेळ्यांवर भयंकर प्रयोग; चौघांवर गुन्हा दाखल..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- शहरालगतच्या अरणगाव शिवारातील मेहेरबाबा ट्रस्ट फॉरेस्ट परिसरात शेळ्यांना युरियामिश्रित चारा खाऊ...