Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढले जात आहे. अशात बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. बीडमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण खून केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अजय भोसले (३० वर्षे) आणि भरत भोसले (३२ वर्षे) अशी हत्या झालेल्या सख्ख्या भावांची नावं आहेत.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामधील वाहिरा परिसरात ही घटना घडली. दोघे भाऊ बीड-नगर हद्दीवरील आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे रहिवासी होते.हातवळण गावापासून ५ किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.