spot_img
महाराष्ट्रबीडचा झालाय बिहार! पुन्हा घरात घुसून 'गोळीबार'

बीडचा झालाय बिहार! पुन्हा घरात घुसून ‘गोळीबार’

spot_img

Maharashtra Crime News: बीडमध्ये बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणातील आरोपीने बीड शहरातील पेठ भागातील घरात घुसून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आमदाराच्या कार्यकर्त्यांकडून हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये काही दिवसांपूर्वी बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या व्यक्तीकडून हा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे. मात्र जुन्या वादाच्या कारणावरून हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर घरात घुसून करण्यात आलेल्या गोळीबारात विश्वास डोंगरे हे गंभीर जखमी असून त्यांना संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलवण्यात आले आहे.

दरम्यान या आधी देखील याच कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती असून बनावट नोटांच्या प्रकारणात हा आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे बीडचा बिहार झालाय, अस म्हणणाऱ्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बनावट नोटा प्रकरणी आरोपी असणाऱ्या आठवले नामक कार्यकर्त्याने हा गोळीबार केल्याचे देखील समोर येत आहे. यामुळे बीड शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान गोळीबार झाल्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणात गंभीर जखमी असणाऱ्या विश्वास डोंगरे यांचा जबाब घेण्यासाठी पेठ बीड पोलीस संभाजीनगरला रवाना झाले आहेत. दरम्यान गोळीबार कोणत्या कारणातून करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून बीड शहरात घडत असलेल्या या घटनांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बीड जिल्ह्यात २७ डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड जिल्ह्यात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाविषयी आंदोनलातच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू करण्यात आलं आहे. १६ तारखेपासून अधिवेशन सुरू असून, या दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. १२ डिसेंबरपासून मनाई लागू करण्यात आला असून, २७ डिसेंबरपर्यंत हा मनाई आदेश लागू असणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात मनाई आदेशाच्या पार्श्वभूमीवर, पाच पेक्षा अधिक जणांना परवानगीशिवाय एकत्र जमण्यास बंदी असणार आहे. त्याशिवाय मार्चा, आंदोलने सभा, उपोषणे परवानगीशिवाय घेणयासही बंदी असणार आहे. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...