spot_img
अहमदनगरमारहाण, अटक अपघात, अत्याचार ; नगरमधील क्राईम वाचा, एका क्लिकवर..

मारहाण, अटक अपघात, अत्याचार ; नगरमधील क्राईम वाचा, एका क्लिकवर..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
हद्दपार आरोपी विजय भनगाडे ताब्यात कोतवाली पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर शहरातून हद्दपार करण्यात आलेला विजय गजानन भनगाडे (वय 32, रा. भवरी चाळ, संभाजी कॉलनी) हा परवानगीशिवाय पुन्हा शहरात परतल्याने कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. विजय भनगाडेविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. भनगाडे याला 18 मार्च 2024 रोजी दोन वर्षांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, त्याने परवानगी न घेता आपल्या राहत्या घरी परत येत आदेशाचा भंग केला. पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजेंद्र लोळगे पो.कॉ. लोळगे, पोहेकॉ विनोद बोरगे, पो.कॉ. शिरीष तरटे, पो.कॉ. हरिदास कोतकर आणि पो.कॉ. सोमनाथ केकाण यांच्या पथकाने भवरी चाळ परिसरात छापा टाकत त्याला ताब्यात घेतले.

अल्पवयीन मुलीच्या भावाला मारहाण
अहिल्यानगरशहरातील आदर्श नगर येथे एका अल्पवयीन मुलीला फोनवरून घरी बोलावून तिच्यासह भावाला मारहाण केल्याची आणि कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जितेंद्र अनिल परळकर याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.31 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जितेंद्रने अल्पवयीन मुलीला त्याच्या मोबाईलवरून घरी बोलावले आणि जर तिने नकार दिला, तर त्यांनी एकत्र काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरून ती त्याच्या घरी गेली. तेव्हा तिचा भाऊ देखील तिथे पोहोचला त्यानंतर त्याच्यात वाद झाला.यावेळी जितेंद्रने भावाला मारहाण करत अपमानास्पद शब्दांचा वापर करून कुटुंबाचा मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जितेंद्र अनिल परळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांधी मैदान परिसरात एकाला लोखंडी रॉडने मारहाण
अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहात दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून गौरव ईश्वर सारसर (वय 40) यांच्यावर चार जणांनी एकत्र येत हल्ला केला. यामध्ये लोखंडी रॉडने डोक्यावर वार केल्यामुळे गौरव गंभीर जखमी झाले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 31 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते मित्र संजय सावरे यांच्यासोबत गांधी मैदान परिसरात बसले होते. यावेळी लघवीसाठी गेले असता, सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ ऋषीकेश विजय मोरे, सनी शिंदे, अक्षय शर्मा आणि प्रमोक्ष पंजाबी हे दारूच्या नशेत होते. त्यांनी गौरव यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. गौरव यांनी पैसे नसल्याचे सांगताच, चौघांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याच दरम्यान, ऋषीकेश मोरे याने लोखंडी रॉडने गौरव यांच्या डोक्यावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

भीषण अपघात चालकाचा मृत्यू
हैदराबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्याभीषण अपघातात आयशर टेम्पो चालक इंद्रपाल विजयसिंह (वय 37) यांचा मृत्यू झाला. हा अपघात 30 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार, इंद्रपाल विजयसिंह हे 29 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता ( एमएच 12 डब्ल्यू. जे 5736) क्रमांकाच्या टेम्पोमधून भाजीपाला घेऊन हैदराबादकडे निघाले होते. झहीराबाद येथे पोहोचल्यावर सोलापूर-हैदराबाद महामार्गावर समोरून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने (टी. एस 16. यु. ए 5766) त्यांच्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेत इंद्रपाल गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना झहीराबाद येथील वैद्यकीय विधानपरिषद रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी इंद्रपाल यांचे भाचे मानवेंद्र विजयसिंह (वय 23) यांनी तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीसांनी संबंधित कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास झहीराबाद पोलीस स्टेशन (तेलंगणा) यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

तलवार बाळगणारा इसम ताब्यात
अहिल्यानगरशहरातील माळीवाडा येथील साठे वसाहत परिसरात तलवार आणि कोयते घेऊन रस्त्यावर दहशत पसरवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सचिन अनिल गायकवाड (वय 35, रा. साठे वसाहत, हरिजन वस्ती, माळीवाडा) असे त्याचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी तलवार आणि तीन लोखंडी कोयते जप्त केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमोल दिलीप गाडे (वय 38) यांनी याबात फिर्याद दिली आहे. 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक गणेश बाळासाहेब देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सचिन गायकवाड तलवार घेऊन साठे वसाहतीत रस्त्यावर आरडाओरड करत आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ विनोद बोरगे, पो.कॉ. विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, अतुल काजळे, महेश पवार यांनी त्वरित माळीवाडा परिसरात धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडे तलवार व तीन लोखंडी कोयते सापडले. पोलिसांनी सर्व शस्त्र पंचनामा करून जप्त केले असून, त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जरांगेंसह मराठ्यांच्या रोषाचे धनी देवेंद्र फडणवीस?

आंदोलनाची व्याप्ती वाढत चालल्याने देवाभाऊंसह गृहखात्याची संपूर्ण यंत्रणा सपशेल अपयशी | जरांगे पाटलांची मुख्य...

‘आंदोलनाला परवानगी दिलीच कशी?’ हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, कोर्टात नेमकं काय घडलं? दिला मोठा आदेश

मुंबई / नगर सह्याद्री - Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज...

आंदोलनावर तोडगा न निघाल्यास…; पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाचा इशारा..

पारनेर | नगर सह्याद्री मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते...

सीएसएमटी स्थानकात आंदोलकांचा गोंधळ!, लोकल अडवली, पुढे नेमकं काय घडलं?

रुळावर उतरून लोकल अडवली | चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र मुंबई | नगर सह्याद्री मराठा आरक्षणाचा मुद्दा...