PM Kisan Yojana :केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे. पीएम सन्मान निधीचा हा १९वा हप्ता असणार आहे. याआधी एकूण १८ हप्ते देण्यात आले आहे. पीएम किसान सन्मान निधीत वर्षाला ६००० रुपये दिले जातात.
दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये हे ६००० रुपये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात. यामागचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. दरम्यान या योजनेत तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात हप्ता मिळणार की नाही याबाबत माहिती अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पीएम किसान योजनेत २००० रुपये २४ फेब्रुवारीला दिले जाणार आहेत. हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. याबाबत तुमच्या हप्त्याची माहिती वेबसाइटवर दिली आहे.
तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही.यासाठी तुम्ही ओटीपी बेस्ड केवायसी करु शकतात. फेस ऑथेंटिकेशन बेस्ड केवायसी करु शकतात. बायोमॅट्रिक बेस्ड केवायसी करु शकतात.