spot_img
महाराष्ट्रबा विठ्ठला कृपा कर, राज्य दुष्काळमुक्त होवू दे! माजी खासदार विखे पाटील...

बा विठ्ठला कृपा कर, राज्य दुष्काळमुक्त होवू दे! माजी खासदार विखे पाटील पांडूरंगाच्या चरणी नतमस्तक

spot_img

पंढरपूर । नगर सहयाद्री:-
बा विठ्ठला कृपा कर आणि राज्य दुष्काळमुक्त होवू दे आशी प्रार्थना करीत डॉ सुजय विखे पाटील पांडूरंगाच्या चरणी नतमस्तक झाले.पंढरपूर येथे जिल्ह्यातून गेलेल्या दिंड्या मध्ये सहभाग घेवून त्यांनी वारकर्या समवेत विठूनामाचा जयघोष केला.

डॉ सुजय विखे पाटील यांनी आषाढी वारीच्या निमिताने पंढरपूर येथे पांडूरंगाचे दर्शन घेतले.तत्पुर्वी त्यांनी नगरसह राज्यातून आलेल्या दिंड्यामध्ये पायी चालून भक्तीमय वातावरणाचा आनंद घेतलाअहील्यानगर जिल्ह्यातून पंढरपूर मध्ये आलेल्या सर्व वारकर्याशी संवाद साधला. येथील सोयी सुविधांबाबत माहीती घेतली.

विखे पाटील परीवारच्या वतीने पंढरपूर मध्ये विकसित करण्यात आलेल्या आश्रमात मोठ्या संख्येने वारकरी उतरले आहेत.तिथेही डाॅ.विखे पाटील यांनी जिल्ह्यातील वारकर्याच्या भेटी घेतल्या.

राज्यात चांगला पाऊस होवू दे आणि राज्यातील दुष्काळ हटू दे आशी प्रार्थना आपण पांडूरंगाच्या चरणी केली असून आषाढ वारीच्या अध्यात्मिक सांस्कृतिक सोहळ्याच्या त्यानी सर्वाना शुभेच्छा दिल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...