spot_img
देशसावधान!! तीन फौजदारी कायदे 'लॉंच' होणार? तारीख ठरली, वाचा सविस्तर

सावधान!! तीन फौजदारी कायदे ‘लॉंच’ होणार? तारीख ठरली, वाचा सविस्तर

spot_img

New Criminal Laws:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत तीन कायद्याचे विधेयके सादर करून ते मंजूर करून घेतले होते. त्यानंतर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी कायद्यांना संमती दिली होती. अत्ता लवकरच म्हणजे १ जुलैपासून देशात तीन फौजदारी कायदे लागू केले जाणार आहे.

केंद्रीय मंत्री शाह यांनी ११ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) (एनबीएस-२०२३), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय सुधारणा) (बीएनएसएस-२०२३) व भारतीय साक्ष (द्वितीय सुधारणा) (बीएस-२०२३) अशी तीन विधेयके सादर केली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनीही या कायद्यांना संमती दिली.

हिट अँड रन प्रकरणात जी तरतूद होती, त्याला देशभरातून विरोध झाला. या तरतुदीवर फेरविचार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.. तत्पूर्वी हे तीनही कायदे १ जुलैपासून देशात लागू केले जाणार, असे केंद्र सरकारने शनिवारी (२४ फेब्रुवारी) जाहीर केले

ही तीन विधेयके ब्रिटिश काळातील अनुक्रमे भारतीय दंड संहिता (१८६०), फौजदारी प्रक्रिया संहिता (१८८२) व भारतीय पुरावा कायदा (१८७२) या कायद्यांची जागा घेणार आहेत.मागच्या हिवाळी अधिवेशनात सुधारीत या तीनही कायद्यांना लोकसभा आणि राज्यसभेने मंजुरी दिली. तसेच २५ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या कायद्यांना संमती दिली आहे.

‘नवा’ कायदा नेमका कसा?

नवे फौजदारी कायदे देशातील जनतेला ब्रिटिशकालीन वसाहतवादाच्या मानसिकतेतून बाहेर काढणार आहेत. आधीचे तीनही फौजदारी कायदे ब्रिटिशांनी तयार केले होते. तेव्हापासून हे कायदे बदलण्यात आले नव्हते. भारत स्वतंत्र होऊनही आजवर आपण इंग्लंडच्या कायद्यानुसार काम करत होतो. नव्या भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार आता राजद्रोह कलमाची जागा आता देशद्रोह कलम घेणार आहे. जुन्या भारतीय दंड विधानमध्ये राजद्रोहाला सरकारविरोधातील कार्य म्हणून सांगितले गेले होते. मात्र, बीएनएसमध्ये त्याला बदलून देशद्रोह असे बदलण्यात आले आहेत. सरकारवर कुणी टीका करतो शकतो, मात्र जो देशाच्या सुरक्षेला-अखंडतेला बाधा पोहोचवणारे कृत्य किंवा भाष्य करेल, तो या कलमान्वये गुन्हेगार ठरणार आहे.

‘हिट अँड रन’ कायदा नेमका काय?

जानेवारी महिन्यांत देशभरातील काही वाहतूक संघटनांनी नव्या कायद्यातील हिट अँड रन तरतुदीबाबत आंदोलन केले होते. निष्काळजीपणामुळे किंवा भरधाव वाहन चालवित असताना कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आणि संबंधित वाहन चालकाने तिथून पळ काढल्यास त्याला १० वर्षांचा तुरुंगवास आणि मोठा दंड भरावा लागणार होता. वाहतूक संघटनांनी देशभरातील वाहतूक अडवून तीव्र आंदोलन केल्यानंतर केंद्र शासनाने या कलमातील तरतुदी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी सल्लामसलत करून अंतिम केल्या जातील, असे आश्वासन दिले होते.

१ जुलैपासून देशात नवे फौजदारी कायदे!

भारतीय न्याय सहिता

भारतीय नागरी संरक्षण संहिता

भारतीय साक्ष अधिनियम

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी : तनपुरे, वर्पे यांच्या पाठोपाठ लंके यांचा ईव्हिएम पडताळणीसाठी अर्ज, केली ‘ही’ मागणी

१८ बुथवरील मतांची पडताळणी करण्याची मागणी ८ लाख ४९ हजार ६०० रूपये शुल्क जमा पारनेर /...

बच्चू कडू यांच्याबद्दल विखे पाटीलांचे मोठे विधान

राहाता / नगर सह्याद्री - Radhakrishn Vikhe Patil | Bachchu Kadu : महाराष्ट्रात महायुतीच्या...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा झटका बसला....

आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नका!; पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्यांना राठोड यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक हे एकनिष्ठ आहेत. कोणीही तुटणार...